breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी महापालिकेच्या ‘महापाैर चषक’ स्पर्धांची चाैकशी करु – राज्यमंत्री अदिती तटकरे

महापाैर चषक स्पर्धांच्या तक्रारीतील चाैकशी अहवालानंतर योग्य ती कारवाई करणार

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध खेळांच्या महापाैर चषक स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्या स्पर्धांच्या भ्रष्टाचाराबाबत विरोधी राष्ट्रवादी काॅंग्रेसने सतत तक्रारी क्रीडा विभागाकडे केलेल्या आहेत. याबाबत त्या तक्रारीची माहिती घेवून सखोल चाैकशी अहवाल आल्यानंतरच योग्य ती कारवाई करु, असे आश्वासन क्रीडा, सांस्कृतिक व पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी आमदार आण्णा बनसोडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापाैर मंगला कदम, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, विद्यार्थी आघाडीचे सुनिल गव्हाणे आदी उपस्थित होते.

तटकरे म्हणाल्या की, महापाैर चषकांच्या तक्रारी आल्या असतील, त्याबाबत पक्षाच्या लोकांकडूनही समजले. सदरील तक्रारीविषयी सखोल चाैकशी करुनच कशा पध्दतीने आयोजन केले. त्यात कसा भ्रष्टाचार झाला. याची सविस्तर चाैकशी अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. कोणत्याही स्पर्धा आयोजन करत असताना त्या स्पर्धा योग्य पध्दतीने पार पाडण्याची जबाबदारी आयोजकांची दुपटीने असते. खेळाप्रती प्रत्येकाला प्रेम असते. आयोजनात कुठल्याही पध्दतीने चुकीच्या गोष्टी घडू नये, असेही त्यांनी सांगितले.

तसेच अतिशय प्रतिकूल परस्थितीतून राज्य जात आहे. आर्थिक मंदी, कोरोना व्हायरस, महिला सुरक्षेचा प्रश्न, अवकाळी पावसासह शेतक-यांना भेडसावणारे प्रश्न, अशा परिस्थितीत अर्थमंत्री अजितदादांनी समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प सादर केला. तसेच शेतक-यांना कर्जमाफी देवून दिलासा दिला. महिला अत्याचाराबाबत दिशा कायद्याची लवकरच अमंलबजावणी होईल. त्यामुळे सर्व घटकांना सामावून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. असेही तटकरे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button