breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

येत्या शनिवारपासून पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना लसीकरण

पिंपरी / महाईन्यूज

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड -१९ वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी शासनानकडून कोविड-१९ लसीकरण १६ जानेवारी २०२१ पासून सुरू करण्याबाबत सुचना प्राप्त झालेल्या आहेत. सदरची लस आरोग्य सेवा देणा-या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना प्राधान्याने देण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे आजपर्यंत १७ हजार ७९२ आरोग्य सेवा देणा-या लाभार्थींची नोंदणी झालेली आहे.

शासनाच्या सुचनेनुसार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून कोविड -१९ लसीकरणासाठी यमुनानगर रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, वाय.सी.एम.रुग्णालय, पिंपळे निलख दवाखाना, कासारवाडी दवाखाना, तालेरा रुग्णालय व ईएसआयएस रुग्णालय अशी ०८ लसीकरण केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. या ठिकाणी आरोग्य सेवा देणा-या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांचे लसीकरण होणार आहे.

उपसंचालक, आरोग्य सेवा पुणे मंडळ यांचेकडून कोविड-१९ लसीकरणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला दि.१३ जानेवारी २०२१ रोजी रात्री २.३० वाजता १५ हजार डोस प्राप्त झालेले आहेत. दि.१६ जानेवारी २०२१ पासून निश्चित केलेल्या ०८ लसीकरण केंद्रावर आरोग्य सेवा देणा-या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना प्राधान्याने देण्यात येणार आहे. कोविड-१९ लसीकरणाचा शुभारंभ दि.१६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी-१०.३० वाजता होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button