#CoronaVirus: कोरोनाचा आढावा घेण्यासाठी सुरु होती बैठक, उपमुख्यमंत्री बोलत असतांनाच नाकातून आलं रक्त
आग्रा: उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये युद्ध स्तरावर प्रयत्न सुरु केलेले आहेत. याच प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा यांनी बैठक बोलावलेली होती. बैठक सुरु असतांनाच त्यांच्या नाकामधून रक्त येऊ लागलं होत. डॉक्टरांच्या तपासणीनंतर त्यांनी शर्मा यांना आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे.
उपमुख्यमंत्री शर्मा यांनी जिल्ह्यातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी सक्रिट हाऊसवर बैठक बोलावलेली होती. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व जण हजर होते. बैठक सुरु असतांनाच उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांच्या नाकातून रक्त येण्यास सुरुवात झाली त्यामुळे सगळेच अधिकारी घाबरले होते. तातडीने डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं होत. डॉक्टरांनी शर्मा यांची तपासणी केली आहे. त्यानंतर काळजीचं कारण नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. काही वेळातच त्यांना बरं वाटल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे. शर्मा यांचं ब्लड प्रेशर आणि इतर गोष्टी सामान्य आहेत अशी माहितीही डॉक्टरांनी दिली होती.