breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: चिंताजनक! अहमदनगरमध्ये एकावर एक रचलेले 12 कोरोना रुग्णांचे मृतदेह, शिवसेना नगरसेवकाकडून व्हिडीओ जारी

अहमदनगर : राज्यभरात कोरोना रुग्णांच्या उपचारावर भर दिला जात असताना अहमदनगरमध्ये  मात्र, कोरोना रुग्णांचे मृतदेह हाताळताना आरोग्य विभागाकडून अक्षम्य दर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळालं. पालिकेच्या एकाच रुग्णवाहिकेत 12 कोरोना रुग्णांचे मृतदेह अस्ताव्यस्तपणे रचल्याचं समोर आलेलं आहे. शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी या प्रकाराचा भांडाफोड केला आहे. तसेच प्रशासनावर अत्यंत असंवेदनशीलपणाचा आरोप करत आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी या प्रकाराचा एक व्हिडीओ देखील जारी केलेला आहे.

अहमदनगरमध्ये आज (10 ऑगस्ट) दिवसभरात एकूण 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. यात 4 महिला आणि 8 पुरुषांचा समावेश आहे. यानंतर पालिका प्रशासनाकडून या 12 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी होती. मात्र, पालिका प्रशासनाने अत्यंत बेजबाबदारपणे सर्व 12 मृतदेह एकावर एक रचत एकाच रुग्णवाहिकेत टाकलेले होते. अमरधाम येथे गेल्यावरही हे मृतदेह अस्ताव्यस्त टाकून देण्यात आलेले होते, असा गंभीर आरोप नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केलेला आहे.

बाळासाहेब बोराटे यांनी प्रशासनाच्या या बेजबाबदारपणाचा भांडाफोड करणारा एक व्हिडीओ देखील शेअर केलेला आहे. तसेच कोरोना रुग्णांची मृत्यूनंतरही अवहेलना होत असल्याचा आरोप केलेला आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत रुग्णवाहिकेत एकावर एक अस्ताव्यस्त रचून ठेवलेले 12 रुग्णांचे मृतदेह दिसत आहेत. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असल्याचं मत बोराटे यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी या प्रकरणी जन आक्रोश आंदोलन करणार असल्याचाही इशारा दिलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button