breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
#CoronaVirus: ओबामा हे अकार्यक्षम अध्यक्ष- डोनाल्ड ट्रम्प
बराक ओबामा हे खूपच अकार्यक्षम अध्यक्ष होते अशी टीका अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ओबामा यांनी अलीकडेच ट्रम्प यांच्यावर करोना विषाणूची साथ बेदरकारपणे हाताळल्याबाबत टीका केली होती त्यावर प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांनी सांगितले की, ओबामा हे अकार्यक्षम अध्यक्ष होते. एवढेच मी सांगू शकतो.
कॅम्प डेव्हीड येथून व्हाइट हाऊस मध्ये परतल्यानंतर ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केली. ओबामा यांनी भाषणात ट्रम्प यांनी करोनाची साथ अतिशय वाईटपणे हाताळल्याची टीका केली होती.