breaking-newsताज्या घडामोडी

खळबळजनक! अल्पवयीन मुलाने पित्याची हत्या करून मृतदेह घरात पुरला

कन्नड | महाईन्यूज

अल्पवयीन मुलाने जन्मदात्या पित्याचा खुन करून त्याचे प्रेत घरात पुरून ठेवल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील जामडी घाट येथील नामदेव पोमा चव्हाण ( ४७ ) हे दोन ते अडीच महिन्यांपासुन बेपत्ता होते. या संदर्भात त्यांची पत्नी लताबाई हिने ११ फेब्रुवारी २०२० रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात तशी खबर दिली होती. मात्र या घटनेचा उलगडा शनिवारी झाला आहे. मयताचा मोठा भाऊ किसन पोमा चव्हाण याने लताबाईस विश्वासात घेऊन बेपत्ता नामदेव बद्दल माहिती विचारली तेंव्हा मोठ्या मुलाने त्यांना मारून टाकल्याचे दोन दिवसांपूर्वीच सांगीतल्याचे सांगीतले. त्यानंतर मुलास विचारले तेंव्हा त्याने याबाबत कबुली दिली आहे. वडीलांना दारू पिण्याची सवय होती. ते नेहमीच दारू पिऊन घरी येत. आई लताबाई बरोबर भांडण झाल्याने ती गावाला निघुन गेली होती.

घरात आम्ही दोघे भाऊ व बहीण होतो. वडील नेहमीप्रमाणे २२ डिसेंबर २०१९ रोजी दारू पिऊन घरी आले व शिवीगाळ करू लागले. त्यामुळे लहान बहीण व भाऊ घरातुन बाहेर पळाले. वडिलांनी कुऱ्हाड घेऊन मला मारण्याचा प्रयत्न केला पण दारू जास्त पिलेले असल्याने त्यांचा तोल गेल्याने ते खाली पडले. मी घरातील काठीने त्यांच्या मानेवर प्रहार केला. ते बेशुध्द पडल्याचे पाहुन घरातील कासऱ्याने त्यांचा गळा आवळला. त्यानंतर घरातील पलंग बाजुला सरकवुन खड्डा खणला व प्रेत खड्डयात टाकून बुजून टाकले व परत शेणाने सारवून घेतले. अशी माहिती आरोपी विधी संघर्ष बालकाने पोलीसांसमोर दिली.ही घटना ऐकून पोलीसही सुन्न झाले. त्यांनी तहसिलदार यांना पत्र देऊन पुढील कारवाई सुरू केली आहे. अद्याप पोलीस ठाण्यात कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button