breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

जगभरात दहशत पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसनं भारतातल्या बहुतांश राज्यात पाय पसरले आहेत. करोना व्हायरसला रोखण्यासाठी देश एकवटला आहे. महामारीवर मात करण्यासाठी पंतप्रधानांनी २१ दिवसांसाठी देशात लॉकडाऊन घेतला आहे. आज लॉकडाउनचा नववा दिवस आहे. त्या धर्तीवर मोदी यांनी सकाळी नऊ वाजता देशवासींना एक व्हिडिओ संदेश दिला. यावेळी करोना या महामारीच्या लढ्यात कोणीही एकटं नाही. आपण सर्वजण सोबत असल्याचं मोदी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी येत्या रविवारी म्हणजे पाच एप्रिलला रात्री नऊ वाजता नऊ मिनिटं घरातील सर्व वीज बंद करण्याचं आवाहन केले आहे. पाहूयात मोदी यांच्या भाषणातील महत्वाचे नऊ मुद्दे…

  • लॉकडाउनच्या काळात सर्व भारतीयांन अनुशासन दाखवले. सर्वांनी मिळून करोनाविरूद्धचा लढा दिला आहे. करोनाशी लढण्यासाठी देश एकवटला. भारतीयांनी कायदा आणि सेवाभाव याचे जे दर्शन घडवलं आहे ते अतुलनिय आहे. शासन, प्रशासन आणि जनतेने एकत्रपणे या संकटाचा आतापर्यंत योग्य प्रकारे सामना केला आहे.
  • देशव्यापी लॉकडाउनला आज ९ दिवस होत आहेत. आजपर्यंत ज्या प्रकारे लोकांनी सहकार्य केलं ते उल्लेखनीय आहे. २२ मार्च रोजी सर्वांनी करोनाविरुद्ध लढणाऱ्यांचे आभार मानले.
  • घंटी वाजवून, थाळ्या वाजवून भारतीयांनी जगाला दाखवून दिलं की, करोना व्हायरसविरोधात देश एक होऊन लढू शकतो.
  • लॉकडाऊनच्या या काळात आपण घरात नक्कीच आहोत, मात्र आपल्यातला कोणीही एकटं नाही. प्रत्येकजण एकमेकांसोबत आहे.

– करोनाच्या अंधःकारमय संकटाला पराभूत करण्यासाठी आपल्याला प्रकाशाचं तेज चारही दिशांना पसरवलं पाहिजे

– कोरोनामुळं निर्माण झालेल्या संकटातून गरिबांना पुढे घेऊन जायचंय, प्रकाशाकडे त्यांना न्यायचं आहे.

– रविवारी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता फक्त ९ मिनिटांसाठी घरातील सर्व दिवे मालवून गॅलरीत उभे राहून मेणबत्ती, दिवे मोबाईलची फ्लॅश लाइट लावून उभे राहा. आपण सर्वजण मिळून करोनाच्या या अंधकाराला मिटवूयात. घरातील सर्व लाईट बंद असेल सर्वजण एक एक दिवा लावेल त्यावेळी प्रकाश चारी बाजूनं पडेल आणि आपण सर्वजण सोबत असल्याची भावना निर्माण होईल. यावेळी असा संकल्प करा की आपण सोबत आहे.

– कोणीही एकत्र यायचे नाही. सोशल डिस्टसिंग तोडायचं नाही.करोनाची साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टसिंग हा एकमेव उपाय आहे.

– सोशल डिस्टन्सिंगच्या लक्ष्मणरेषेला कधीच पार करायचं नाही. कोरोनाला पराभूत करण्याचा हाच रामबाण उपाय आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button