#CoronaVirus | अमेरिकेमध्ये एका दिवसात सर्वाधिक मृत्यूंची नोंद
वॉशिंग्टन | अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या सतत वेगाने वाढत आहेत. जगभरातील सर्व देशांपैकी सर्वाधिक कोरोना बाधित अमेरिकमध्ये आहेत. सध्या अमेरिकेमध्ये 4 लाख 34 हजार 927 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 31 हजार 935 नवे रूग्ण समोर आले आहेत. तर 14 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत अमेरिकेत 14 हजार 788 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 1940 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये एका दिवसात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.
अमेरिकेमध्य एकूण 4 लाख 34 हजार 927 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 3 लाख 97 हजार 248 रूग्ण आहेत. अमेरिकेमध्ये एकूण 279 रूग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर 22 हजार 891 लोक उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले आहेत.