breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 20,64,278 वर

  • मुंबईत 645, पुण्यात 635 नवे रुग्ण!

मुंबई – देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे काल, रविवारी आढळलेल्या 4,092 नव्या कोरोना रुग्णांसह महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 20,64,278 वर पोहोचली आहे. तसेच दिवसभरात 1,355 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 40 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या 19,75,603 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 51,529 वर पोहोचला आहे. तर सध्या राज्यात 35,965 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत रविवारी कोरोनाचे 645 नवे रुग्ण आढळले, तर 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 3,14,076 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 11,417 इतका झाला आहे. तसेच काल दिवसभरात 309 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने मुंबईत सध्या 5,608 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

त्याचबरोबर सुरुवातीला दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 635 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3,92,835 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 9,142 इतका झाला आहे. तसेच काल 482 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यात आतापर्यंत 3,79,072 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल आढळलेल्या 635 नव्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील 354, पिंपरी-चिंचवडमधील 150, ग्रामीण भागातील 95 आणि कंटेनमेंट झोनमधील 36 रुग्णांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button