breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबई

प्रत्यक्ष कर संकलनात ३३ टक्क्यांनी वाढ, उद्दीष्ट्यपूर्ती होणार?

नवी दिल्ली । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

प्रत्यक्ष कर संकलनात यंदा गेल्यावर्षीपेक्षा ३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ३० ऑगस्टपर्यंत ४.८८ ट्रिलिअन रुपयांचे कर संकलन जमा झाले आहे, गेल्यावर्षी हाच आकडा ३.६ ट्रिलिअन रुपये इतका होता. कर संकलनाचा दर असाच राहिला तर कर उद्दीष्ट्य साध्य करू असा विश्वास केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी व्यक्त केलाय. बिझनेस स्टॅण्डर्डला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. आर्थिक वर्ष २०२३ साठी १४.२० ट्रिलिअन रुपयांचे कर संकलनाचे उद्दीष्ट्य निश्चित करण्यात आले आहे. कॉर्पोरेट करातून ७.२ ट्रिलिअन तर, वैयक्तिक आयकर आणि सिक्युरिटीज ट्रांजेक्शन टॅक्ससह विविध उत्पन्नांवरील करातून ७ ट्रिलिअन कराचे उद्दीष्ट्य निश्चित करण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी जमा झालेल्या कॉर्पोरट करापेक्षा यंदा २५ ते २६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कर संकलनाचा दर असाच राहिला तर आपण आपलं उद्दीष्ट्य निश्चित साध्य करू शकतो असा विश्वास केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी व्यक्त केलाय.

जीएसटीचेही संकलन चांगले
एकीकडे प्रत्यक्ष कर संकलनात वाढ झालेली असताना वस्तू आणि सेवा कर संकलनातही ऑगस्ट महिन्यात २८ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली. अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात १ लाख ४३ हजार ६१२ कोटींचे जीएसटी संकलन झाले आहे. यापैकी २४ हजार ७१० कोटी केंद्र सरकारचे जीएसटी संकलन आहे तर, ३० हजार ९५१ कोटी राज्यांची जीएसटी संकलन आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button