breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 लाखांच्या वर,तर 25,575 लोकांचा मृत्यू

अमेरिकेत कोरोना विषाणूबाधित रुग्णांच्या संख्येने सहा लाखांचा आकडा पार केला आहे. आतापर्यंत या विषाणूमुळे २५ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या सेंटर फॉर सिस्टिम सायन्स अँड इंजिनिअरिंगने (सीएएसी) याची माहिती दिली आहे. 

एका इंग्रजी वृत्तसंस्थेनं जारी केलेल्या नवीन आकडेवारीच्या हवाल्यानुसार अमेरिकेत मंगळवारी स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ६.५० पर्यंत कोविड-१९ संक्रमिक रुग्णांची संख्या ६,०२,९८९ इतकी आहे. तर या विषाणूमुळे २५,५७५ लोकांचा मृत्यू झाला आहे. 

आकडेवारीनुसार, कोरोना विषाणूमुळे बाधित अमेरिकेतील सर्वांत प्रभावित राज्य न्यूयॉर्कमध्ये एकूण १०,८३४ मृत्यूसह २,०२,६३० प्रकरणे समोर आले आहेत. त्यानंतर न्यूजर्सीत ६८,८२४ प्रकरणांसह एकूण २८०५ जणांचा मृत्यू झाला आहे. 

तरस मॅसाच्युएट्स, मिशिगन, पेनिसेल्व्हिेनिया, कॅलिफोर्निया, इलिनॉस आणि लुईझाना या राज्यातून २० हजारहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button