breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: अतिशहाणपणा केल्यानेच मला करोना झाला- जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादी काँग्रसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. करोनावर मात केल्यानंतर जितेंद्र आव्हाड घरी परतले आहेत. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी आपण अती शहाणपणा केल्यानेच आपल्याला करोना झाल्याचं म्हटलं आहे. “१० तारखेला डॉक्टरांनी मला रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं सांगितलं होतं. पण अतिशहाणपणा करण्याचा माझा स्वभाव आहे. त्याला आता मुरड घालावी लागेल. लोकांमध्ये जाण्याची जी सवय होती त्याचे परिणाम भोगावे लागले,” अशी खंत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.