क्रिडाताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणे

राजा शिवछत्रपती संघ उपांत्य फेरीत दाखल!

कै. शंकरराव ढमाले स्मृती चषक ; जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा

पुणे : शिवसेना कसबा मतदार संघ आणि पूना अमॅच्युअर्स संघाच्या वतीने कै. शंकरराव ढमाले स्मृती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत महिला गटाकडून एमएच स्पोर्ट क्लब, प्रकाश तात्या बालवडकर, राजा शिवछत्रपती संस्था, द्रोणा स्पोर्ट क्लब तर पुरुष गटाकडून भैरवनाथ क्रीडा संस्था, भैरवनाथ कबड्डी संघ, सरस्वती क्रीडा संस्था, चेतक संघानी जोरदार कामगिरी करत उपांत्य फेरीत मजल मारली.

महिला गटाच्या एमएच स्पोर्ट क्लबने हॅपी साई संघाचा 64-30 ने पराभव करत विजय खेचून आणला. अंकिता मोहोळ, तनिष्का शिंदे, आदिती चौगुले आदींनी जोरदार खेळी करत विजय मिळवला. तर हॅपी साई संघाकडून ईशा कांबळे, वैष्णवी बनसोडे, मोहिनी राठोड यांनी प्रतिकार केला.

राजा शिवछत्रपती संस्था संघाने आकांक्षा क्रीडा प्रतिष्ठान संघाचा 37-12 ने पराभव केला. सिद्धी मराठे, मृणाल चव्हाण, स्वामिनी जाधव यांनी उत्तम खेळी करत विजयवर मोहोर मिळविली. तर आकांक्षा क्रीडा प्रतिष्ठान संघाकडून पुष्पा चौधरी, गायत्री गोडसे, ऋतुजा मोरे यांनी प्रतिकार केला.

पुरुष गटाच्या भैरवनाथ क्रीडा संस्था संघाने 36-13 ने सचिन भाऊ दोडके संघाचा पराभव केला. भैरवनाथ कबड्डी संघाने 22-20 ने प्रकाश तात्या बालवडकर संघाचा पराभव केला. सरस्वती क्रीडा संस्था संघाने 39-30 श्री कृष्ण संघाचा पराभव केला. अर्णव, ऋतिक, ओम यांनी विजय खेचून आणला. तर श्री कृष्ण संघाकडून ऋषी पाटील, वैभव महाजन, धनंजय कापसे यांनी प्रतिकार केला.

चेतक संघाने 28-21 ने पर्व क्रीडा संस्था संघाचा पराभव केला. स्वप्नील बालवडकर, ओंकार काळभोर, कृष्णा शिंदे यांनी उत्तम कामगिरी करत विजय खेचून आणला. तर पर्व क्रीडा संस्था संघाकडून अजय सोलंकी, वैभव जाधव, संदेश पाटील यांनी उत्तम कामगिरी करत प्रतिकार केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button