breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुणेकरांना नवीन वर्षात मेट्रोचं गिफ्ट…मेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटन…

पिंपरी चिंचवड | महाईन्यूज |

अखेर पुणेकरांची मेट्रोची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. पुणे महामेट्रोचे वल्लभनगर येथील स्टेशनवर मेट्रोची चाचणी सुरु करण्यात येणार आहे. त्या मेट्रो कोचचे आज (मंगळवारी) व्यवस्थापकीय संचालक डाॅ. ब्रिजेश दीक्षित यांचे उद्घाटन करण्यात आले…

पुणे मेट्रोचे कोच रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये दाखलं झाले. दाखलं झालेले मेट्रोचे डबे सोमवारी रूळावर आणण्यात आले. पिंपरीतील या मेट्रोची ट्रायल घेण्यात आली. यावेळी ही नवी मेट्रो पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. या नव्या मेट्रोची नागरिकांमध्य़े प्रचंड उत्सुकता दिसत होती. लोकं मोबाईलमध्ये या नव्या मेट्रोचे फोटो टिपण्यासाठी गर्दी करत होते. त्यावेळी अनेकजण हे कोच पहायला आले होते.कामगारांनी ढोल-ताशांच्या गजरात या मेट्रो कोचचं स्वागत केलं.

मात्र आज म्हणजेच 31 डिसेंबरला नविन वर्षाच्या आगमनाची तयार सुरु असतानाच पुणेकरांचं न्यू ईअर गिफ्ट त्यांना मिळालं आहे .आज पिंपरी चिंचवडमध्ये संत तुकाराम नगर येथील मेट्रो स्टेशनवर या कोचची विधिवत पूजा करत स्वागत करण्यात आलं. यावेळी मेट्रोच्या तीनही कोचला फुलांनी सजवण्यात आलं होतं. मेट्रोचे वैदिक पध्दतीने मंत्रोच्चारण, पूजन करुन श्रीफळ वाहण्यात आला. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डाॅ. ब्रिजेश दीक्षित यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी महामेट्रो प्रकल्पाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. आता ही मेट्रो पुणेकरांच्या सेवेत कधीपासून रुजू होणार याचीच सर्वजन आतूरतेने वाट पाहतायत…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २७ डिसेंबरला पुणे मट्रोच्या कोचचे अनावरण केले होते.मेट्रोचा हा डबा 40 टन वजनाचा असून 20 मीटर लांब आहे. इतर मेट्रोचे डबे देखील लवकरच रुळावर येणार आहेत. त्यामुळे २०२० या नवीन वर्षात पुणेकरांना लवकरच मेट्रोतून प्रवास करता येणार आहे…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button