breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘पीएमपी’ बसेस वेळेत न दिल्याने टाटा मोटर्स कंपनीस नोटीस

  • पीएमपीएमएल बैठकीत निव्वळ चर्चा, निर्णय काहीच नाही

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी पीएमपीच्या दोनशे बसेस टाटा मोर्टस कंपनीकडून घेण्यात येणार आहेत. त्या गाड्या जून, जुलै आणि आॅगस्ट महिन्यात कंपनी देणार होती. मात्र, सीएनजी बसेस वेळेत न दिल्याने पीएमपीकडून नोटीस बजाविली आली असून 11 जूलैला कंपनीच्या व्यवस्थापकांना पीएमपी बैठकीस हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी यांना पत्रकारांशी बोलताना दिली.

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडची आज (बुधवारी) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीत विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली असून त्यात कोणता निर्णय झालेला नाही. त्या कार्यपत्रिकेवरील क्र. १ ते ५ मंजुर झाले. तर ६ ते ८ तहकुब झाले. या बैठकीला पिंपरीचे महापाैर राहूल जाधव, पुण्याचे महापाैर मुक्ता टिळक, स्थायी सभापती विलास मडेगिरी, स्थायी सभापती सुनिल कांबळे, व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्यासह आदी संचालक उपस्थित होते.

या बैठकीत पेन्शन अंमलबजावणी दिरंगाई पी.एम.पी.एम.एल. सेवानिवृत्त कर्मचारी संघाने नाराजी व्यक्त केलीय, कर्मचा-यांना कॅन्सल झाल्यावर ओव्हर टाईम देण्यात येऊ नये, याकरिता  महामंडळाचे उत्पन्न वाढण्यासाठी कर्मचा-यांना प्रोत्साहनपर काही योजना आखण्यात येणार आहेत.  कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत पदावर २४० दिवस पूर्ण झालेल्या सेवकांना कायम करण्याबाबत कोणती कार्यवाही झालेली नाही.

विनापरवाना गैरहजर राहिल्यास, कामात निष्काळजीपणा, अपहार, अपघातातील निष्काळजीपणा त्यातुन जिवित व वित्तहानी
शास्ती देताना संस्थेचे नुकसान झाल्यास  29 बडतर्फ कर्मचा-यांना कामावर घेतलेले नाही, त्यातील 4 लोकांना कामावर घेण्यास समितीने निर्णय दिला आहे.  सध्या महामंडळाची सरासरी मासिक तुट २३.७५ कोटी असून त्यामध्ये वाढ होत चालली आहे. सदरची तुट कमी करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येणार आहे. याकरिता  जाहिरात धोरण राबविण्यात येणार आहे. बसवरील जाहिरात, बसच्या आतिल जाहिरात, बसस्टॉप वरील जाहिरात , बस टर्मिनंस वरील जाहिरात करण्यात येणार आहे.

तसेच टाटा कंपनीकडे सीएनजी 200 बसेसची पीएमपीने मागणी केली. त्यात 74 जून, 85 जूलै आणि उर्वरीत आॅगस्टमध्ये गाड्या देणार आहेत. परंतू, त्यापैकी एकही गाडी पीएमपीकडे आलेली नाही. यापुर्वी टाटा कंपनीला नोटीस बजाविलेली आहे. त्यानंतर आता नव्याने नोटीस बजावून 11 जूलैला होणा-या बैठकीस टाटा कंपनीकडून संबंधित अधिका-यांना उपस्थित राहून त्या गाड्याची माहिती देण्यात यावी, अशा सुचना करण्यात आलेल्या आहेत. त्यानूसार टाटा कंपनीला नोटीस देवून त्यांच्याकडून गाड्याची संध्यस्थिती जाणून घेण्यात येणार आहे, असेही मडेगिरी यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button