breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

National Constitution Day : २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो?

National Constitution Day 2023 : देशभरात २६ नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर १९४९ मध्ये भारतीय संविधान सभेने भारताची राज्यघटना स्विकारली. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.

परंतु संविधान सभेने ही राज्यघटना स्विकारल्यानंतर देशात त्याची अमंलबजावणी होण्यास काही महिने लागले. २६ जानेवारी १९५० रोजी ही राज्यघटना पूर्णपणे लागू करण्यात आली. त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

हेही वाचा  –  ‘३ डिसेंबरनंतर देशात कुठे ना कुठे नरसंहार घडण्याची शक्यता’; प्रकाश आंबेडकरांचं सूचक विधान

संविधान दिनाचे महत्व काय?

आपल्या भारतीय राज्यघटनेत अनेक महत्वपूर्ण तत्त्वे आहेत, ज्यांच्या आधारे देशातील सरकार आणि नागरिकांसाठी मूलभूत, राजकीय तत्त्वे, कार्यपद्धती, अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, कायदे इत्यादी ठरवण्यात आले आहेत.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button