breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

अखेर रामदेवबाबांनी चूक मान्य केली! अ‍ॅलोपॅथीला म्हटले होते ‘मूर्ख विज्ञान’

नवी दिल्ली – योगगुरु रामदेवबाबा यांनी अखेर आपली चूक कबूल केली असून अ‍ॅलोपॅथीबाबत केले वादग्रस्त वक्तव्य मागे घेतले आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड केलेला मेसेज वाचून केलेले ‘अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे’ हे विधान आपण मागे घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कोरोना काळात डॉक्टर घेत असलेले मेहनत संपुर्ण देश पाहत आहे. मात्र याच कोरोना काळात जिवाची बाजी लावणारे डॉक्टर आणि अ‍ॅलोपॅथीबाबत योगगुरु रामदेवबाबा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांची एक ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर फिरत आहे. त्यात ‘अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे. रेमडेसिविर, फॅव्हिफ्लू यांसह औषध महानियंत्रकांनी मान्यता दिलेली अनेक औषधे कोरोनावर उपचार करण्यात अपयशी ठरली आहेत. अ‍ॅलोपॅथिक औषधे घेऊन लाखो रुग्णांचा मृत्यू झाला आहे’, असे वक्तव्य रामदेवबाबा यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यांचा डॉक्टरांनी तीव्र विरोध केला असून डॉक्टरांच्या ‘भारतीय वैद्यकीय संघटने’ने (आयएमए) आक्षेप घेतला आहे. तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनीदेखील याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी रामदेवबाबा यांना पत्र लिहून वक्तव्य मागे घेण्यास सांगितले होते. ‘आपले अ‍ॅलोपॅथीबाबतचे विधान संपूर्ण देशाच्या भावना दुखावणारे आहे. त्या वक्तव्यामुळे आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या मनोबलास धक्का पोहोचू शकतो आणि कोरोनाविरोधातील आपली लढाई कमकुवत होऊ शकते’, असेही हर्ष वर्धन यांनी पत्रात म्हटले होते.

त्यानंतर आता हर्ष वर्धन यांच्या पत्राला उत्तर देताना रामदेवबाबा म्हणाले की, ‘हे प्रकरण शांत करायचे आहे. डॉ. हर्ष वर्धन, आपले पत्र आले. त्यासंदर्भात, वैद्यकीय पद्धतींच्या संपूर्ण विवादास विराम देऊन मी माझे विधान मागे घेतो. मी हे पत्र तुम्हाला पाठवत आहे.’

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button