breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या विविध प्रकल्पांना चारशे कोटी रुपयाचे कर्जरोखे उभारण्यास स्थायी समितीची मंजूरी

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे शहर विकासाच्या अनुषंगाने विविध प्रकल्प करण्याचे नियोजित आहेत. सदर प्रकल्प उभारण्यासाठी मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध करावा लागणार आहे. यासाठी महापालिका रोखे, कर्जरोखे या बाबींचा विचार करीत होती. महापालिकांना विकास कामांसाठी रोखे, कर्जरोखे उभारण्यासाठी येणा-या तांत्रिक अडचणींच्या अनुषंगाने केंद्र शासनाने तांत्रिक सल्लागार म्हणून काही मर्चंट बँकर किंवा फंड अ‍ॅरेन्जर यांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये एसबीआय कॅपिटल मार्केट लिमिटेड यांचा मर्चंट बँकर म्हणून समावेश आहे. मर्चंट बँकर महापालिकांना भांडवली बाजारातून रोखे जमा करण्यासाठी व त्यासंबंधित सर्व कामांमध्ये सहाय्य करतात. तसेच ते महापालिकांना विश्वस्त, निबंधक, कायदेशीर सल्ला इत्यादींच्या नियुक्तीसाठी सहाय्य करतात. त्याअनुषंगाने खुल्या बाजारातून कर्जरोखे उभारण्यासाठी एसबीआय कॅपिटल मार्केट लिमिटेड यांचेकडून महापालिकेस पत्र प्राप्त झाले होते. सबब पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शहर विकासाच्या अनुषंगाने विविध प्रकल्पांसाठी आवश्यक कर्जरोखे उभारण्यासाठी एसबीआय कॅपिटल मार्केट लिमिटेड यांची मर्चंट बँकर म्हणून नेमणूक करणेस स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या विषयासह ऐनवेळचे विषय आणि महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या झालेल्या आणि येणा-या सुमारे ६८ कोटी ६८ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची ऑनलाईन पध्दतीने सभा पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते. सीटी ट्रान्स्फॉरमेशन ऑफिस यांची सल्लागार नेमणूक करण्याकरीता १२ महिने कालावधीसाठी २ कोटी ८९ लाख इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली. महानगरपालिकेची मुख्य इमारत आणि त्यामधील सर्व कार्यालये, बाहय परिसराची खाजगीकरणाव्दारे यांत्रिक पध्दतीने आणि मनुष्यबळाव्दारे दैनंदिंन साफसफाई करण्याकामी १ कोटी ४८ लाख इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. १२ रूपीनगर तळवडे येथे स्थापत्य विषयक देखभाल दुरूस्ती करण्याकामी २६ लाख ३० हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता आयुक्त, अतिरिक्त आयुक्त महापौर, गटनेते, अधिकारी, पदाधिकारी यांचे समवेत दिनांक २२ मार्च २०२१ रोजी झालेल्या मिटींग मधील निर्णया प्रमाणे कै. अण्णासाहेब नगर स्टेडीयम येथील जम्बो कोवीड सेंटर करीता १ कोटी ७१ लाख हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली. नाशिक फाटा ते वाकड या बीआरटीएस कॉरीडॉर वरील डेडीकेटेड लेनची आणि बस स्टॉपची दुरुस्ती अनुषंगिक कामे करण्यासाठी ६८ लाख ९६ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली. १० मधील झोपडपट्टी परिसरात जलनि:सारण विषयक सुधारणा कामे आणि उर्वरित ठिकाणी जलनिःसारण नलिका टाकण्याकामी ३३ लाख ७७ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

ड क्षेत्रिय कार्यालय प्रशासकीय इमारत आणि विविध प्रशासकीय इमारतीकरिता अग्निशमन यंत्रणा बसविण्याकामी ४८ लाख ६३ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.६ मधील पूर्व व पश्चिम भागात रस्त्यांची खडीकरण आणि एम पी एम पध्दतीने सुधारणा करण्यासाठी २९ लाख ५७ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली. जलशुध्दीकरण केंद्र से. २३ येथील टप्पा क्र. ३ आणि ४ खाजगीकरण पध्दतीने चालविण्याकरीता ७१ लाख २५ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली. जलशुध्दीकरण केंद्र से. २३ येथील टप्पा क्र. २ आणि केमिकल हाऊस खाजगीकरण पध्दतीने चालविण्याकरीता ८६ लाख ४० हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. ३० मधील दापोडी परिसरात जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याकामी २६ लाख ४४ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. १२ सहयोगनगर येथील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करण्याकामी ३१ लाख ६७ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली. फ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत वार्ड क्र. ११ मधील स्वामी विवेकानंद मैदानावर वाढीव प्रकाश व्यवस्था करण्याकामी ३७ लाख ५५ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली. क क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत नेहरुनगर स्मशानभूमी येथे विद्युत दाहिनी बसविण्यासाठी १ कोटी २१ लाख हजार येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. ११ मधील स्वामी विवेकानंद हॉल ते थरमॅक्स चौकाकडे जाणा-या रस्त्याचे यूटीडब्लूटी पद्धतीने काँक्रिटीकरण करणेच्या कामात अडथळा येणारे विद्युत खांब, फिडर पिलर व भूमिगत केबल स्थलांतरीत करणेकामी ५५ लाख ५१ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. १३ मधील अमरधाम स्मशानभूमी मध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने नुतनीकरणाची कामे करण्यासाठी ५८ लाख १८ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. १६ मधील वाल्हेकरवाडी भागातील मंगली गार्डन, चिंतामणी मुख्य रस्त्याला नव्याने दुभाजक आणि फुटपाथ करण्यासाठी ५१ लाख ७४ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. १६ मधील रावेत भागातील शिंदेवस्ती चौक ते पाण्याची टाकी, सेलेस्टीअल समोरील रस्ता व एस.बी.पाटील शाळे समोरील रस्त्याला फुटपाथ करण्याकामी ५९ लाख ४१ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली. महानगरपालिकेच्या ८ रुग्णालयामधील स्त्रीरोग विभागासाठी सर्व्हाईकल स्क्रीनींग गव्हर्नमेंट हेल्थ चालु करण्याकरीता वैद्यकिय विभाग यांनी दिलेल्या मागणीनुसार आवश्यक साहित्य आणि उपकरणे पुरवठा करणेसाठी ८५ लाख अधिक जीएसटी इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

थेरगाव स.नं.९ पंप हाऊस येथील पंपिंग मशिनरीध्ये सुधारणा करणे आणि अनुषंगिक कामे करण्याकामी ५५ लाख ९७ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. ३० कासारवाडी येथील रेल्वेगेट ते विसावा हॉटेल पर्यंतचा रस्ता अद्ययावत पध्दतीने विकसित करण्यासाठी ४ कोटी ७३ लाख ७६ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली. मैलाशुध्दीकरण केंद्र रावेत, आकुर्डी, चिखली आणि पंपिंग स्टेशनसाठी एक्सप्रेस फिडरद्वारे अखंडीत विजपुरवठा करणे तसेच अनुषंगिक कामे करण्याकामी ९ कोटी ७३ लाख ६९ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button