breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राहुल नार्वेकरांच्या उपस्थितीत शिवसेनेची घटनादुरूस्ती, ठाकरे गटाने दाखवला २०१३चा व्हिडीओ

मुंबई | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपुर्वी शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला. या निकालानुसार शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे. यावरून ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाने आज महापत्रकार परिषद बोलवली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, नार्वेकरांनी दिलेला निकाल आणि आमदार अपात्रता प्रकरणाचं विश्लेषण केलं.

अनिल परब यांनी सांगितलं की २०१३ साली शिवसेनेच्या घटनेत दुरुस्ती करण्यात आली होती. तसेच पक्षांतर्गत निवडणूक घेऊन उद्धव ठाकरे यांची पक्षाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. या निवडणुकीचा व्हिडीओ परब यांनी यावेळी दाखवला. तसेच त्या निवडणुकीवेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही तिथे उपस्थित होते. कारण त्यावेळी नार्वेकर हे शिवसेनेत होते.

हेही वाचा    –    फोनची बॅटरी लवकर संपतेय? तर आजच ‘या’ सेटिंग करा

२०१८च्या राष्ट्रीय कार्यकारिणीत उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून फेर निवड झाली. या बैठकीत आदित्य ठाकरे यांची नेते पदी बिनविरोध निवड झाली त्यांच्यासोबत ९ नेते आणि २१ उपनेते यांची निवड झाली. या सर्व प्रस्तावाची पोच देण्यात आली होती असे अनिल परब म्हणाले. उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांची नेतेपदी निवड केली होती. नेतेपदी निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भर स्टेजवर उद्धव ठाकरे यांच्या पाया पडले. त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना गुच्छ देऊन स्वागत केले याचा व्हिडीओ अनिल परब यांनी यावेळी दाखविला.

निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर एक कागद टाकला आहे. त्यात पक्षाचं नाव, पक्षप्रमुख कोण आहे, पुढची निवडणूक कधी आहे, याची माहिती दिली आहे. हा अधिकृत कागद आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे यांना बोलावलं होतं. त्यावर उद्धव ठाकरे यांचं नाव आहे. त्यांना बोलावलं जातं. पक्षाध्यक्ष म्हणतात तरीही म्हणतात तुमचे कागदपत्र नाही. आम्ही पुरावे दिल्याशिवाय तुम्ही बदल केले का? असा सवाल अनिल परब यांनी यावेळी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button