breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘औषधी उद्यान’च्या जागेसाठी डॉक्टरांसोबत रस्त्यावर उतरणार!

  • भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा इशारा
  • एमआयडीसी, महापालिका प्रशासनाने जागा परस्पर विकली!
  • आयुर्वेदिक डॉक्टरांची ‘निमा’ संस्था न्यायालयात जाणार

पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेने वनीकरण वृक्षारोपण, आयुर्वेदिक झाडांची जोपासना करण्यासाठी २१ वर्षांच्या कराराने दिलेल्या भूखंडाची परस्पर विक्री केली आहे. शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ‘औषधी उद्यान’ला खोडा घालणाऱ्या या निर्णयाविरोधात डॉक्टरांसोबत रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे.
एमआयडीसीने वनीकरणासाठी असलेल्या या जागेला कमर्शियल स्पेसमध्ये रुपांतरित करत तिची विक्री केली असून याबाबत पालिकेकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही, असा दावा डॉक्टरांसाठी काम करणाऱ्या ‘निमा’ या संस्थेने केला आहे. विशेष म्हणजे, एमआयडसी प्रशासन आणि महापालिकेच्या या भूमिकेविरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही ‘निमा’ संस्थेने दिला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने २००९ साली वनीकरणासाठी राखीव ठेवलेल्या मोकळ्या जागांमधून निमाला भोसरी येथील एक एकर जागा वनीकरण व वृक्षारोपणासाठी २१ वर्षाच्या कराराने दिली होती. महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये याबाबत २७ फेब्रुवारी २००८ रोजी ठराव झाला होता. ही जागा अत्यंत उंच सखल अशी होती. डम्पिंग ग्राउंड म्हणून वापरली जात होती. त्यावर संस्थेच्या सदस्यांनी मेहनत घेत साडेचारशे आयुर्वेदिक वृक्षांची लागवड करत उद्यान फुलविले आहे. झाडे आता सात ते आठ फूट उंचीची झाली आहेत. मात्र, एके दिवशी काही व्यक्तींनी येवून जागा एमआयडीसीने विकली असल्याचे सांगत जागेवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा)चे सचिव डॉ. अभय तांबिले यांनी दिली.
*
एमआयडीसीने जागा परस्पर विकली…?
निमा संस्थेच्या सदस्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागविली. त्यामध्ये ही जागा एमआयडीसीच्या मालकीची असून ती एमआयडीसीने ओपन स्पेस म्हणून वनीकरणासाठी महापालिकेच्या ताब्यात दिली होती. महापालिकेने ही जागा निमा संघटनेला २१ वर्षांच्या कराराने वनीकरणासाठी दिली; मात्र २०१६ मध्ये एमआयडीसीने महापालिकेशी संपर्क न साधता, पालिकेचे अधिकारी हजर नसताना ताब्यात घेतली. तसेच वनीकरणासाठी असलेल्या या जागेला कमर्शियल स्पेस म्हणजेच सीएम मध्ये रुपांतरित करत तिची विक्री केली. ज्यांना ही जागा विकली आहे. त्यांनी पालिकेकडे ही झाडे काढून टाकण्याची विनंती केली आहे. आम्ही कष्टाने उद्यान फुलविले आहे. शहरातील वनीकरण अबाधित रहावे. वनऔषधी उद्यान रहावे यासाठी पालिकेने एमआयडीसीला कळवून दुस-या जागेचा वापर कमर्शियल स्पेससाठी करावा अशी मागणी डॉ. तांबिले यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button