breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
आता रस्त्याला नाव दिलं सुशांतसिंह राजपूत चौक
पटणा | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनाचा देशभरातील चाहत्यांना धक्का बसला. लोक आपआपल्या परिने त्याला श्रद्धांजली देत आहेत. नुकतंच त्याचं मूळ घर पूर्णिया येथील एका रस्त्याला सुशांतसिंह राजपूत चौक असं नाव देण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महापौर सरिता देवी म्हणाल्या, ‘सुशांत एक उत्तम कलाकार होता आणि त्याच्या नावा रस्त्याचं नाव ठेवणं हे त्याला एकप्रकारची श्रद्धांजली वाहण्यासारखं आहे. मधुबनीहून माता चौकला जाणाऱ्या रस्त्याला सुशांतचं नाव देण्यात आलं आहे. एवढंच नाही तर प्रसिद्ध कार कंपनीच्या गोल चक्करचं नाव बदलून आता सुशांतसिंह राजपूत चौक करण्यात आलं आहे.’