breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पेट्रोल-डिझेल संपल्याच्या चर्चेने मध्यरात्री नागरिकांची झुंबड; पंप चालकांनी केलं ‘हे’ आवाहन

हिंगोली : राज्यभरात पेट्रोल व डिझेल पंपांच्या चालकांनी मंगळवारी इंधन खरेदी बंद ठेवण्याचं आंदोलन पुकारलं आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोलीत पेट्रोल पंपावरील डिझेल साठा अचानक संपल्याच्या अफवेने शहरासह तालुक्यातील पंपांवर डिझेल ग्राहकांनी मध्यरात्री १ वाजता मोठी गर्दी केली होती. यामुळे पेट्रोल पंपावर वाहनांच्या मोठ्या दुतर्फा रांगा लागल्याचं पाहायला मिळालं.

पुढील काही दिवस आपल्याला डिझेल मिळणार नाही, या भीतीने अनेकांनी घरातील पाण्याच्या कॅन डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आणले. मात्र इंधनाची कमतरता होणार, ही केवळ अफवा असल्याचं पेट्रोल पंप चालकांनी स्पष्ट केलं आहे. तसंच पेट्रोल युनियनतर्फे एक दिवसाची डिझेल खरेदी बंद ठेवण्यात आली असल्याने डिझेलचा तुटवडा होणार नाही, असं सांगण्यात आलं आहे.

नेमकं का पुकारलं आंदोलन?

पेट्रोल, डिझेल, सीएनजी पंप मालकांना इंधन विक्री कंपनीकडून कमिशन दिले जाते. सध्या पेट्रोल व डिझेलसाठीचे कमिशन २.६० रुपये तर ३.२० रुपयांदरम्यान आहे. पण वाढत्या खर्चाला अनुसरून यात वाढ व्हावी, अशी पंपांच्या मालकांची मागणी आहे. त्यासाठीच पंप मालकांनी मंगळवारी खरेदी बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत ते कंपनीकडून इंधन खरेदी करणार नाहीत. याबाबत ‘फामपेडा’शी संलग्न असलेल्या मुंबई पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे सल्लागार रवी शिंदे यांनी माहिती दिली आहे.

‘इंधन विक्री कंपन्यांनी अलीकडेच एलपीजी गॅस सिलिंडर डीलर्सचे कमिशन वाढवले. सीएनजीच्या वाढत्या दरांसह त्या वितरकांचे कमिशनदेखील वाढले आहे. पण पेट्रोल व डिझेल पंप मालकांचे कमिशन पाच वर्षांत वाढविण्यात आलेले नाही. या पाच वर्षांत कर्मचाऱ्यांचे पगार, वीज वापर खर्च, महागाई आदी सर्वच मोठ्या प्रमाणात वाढले आहे. खर्च वाढेल त्यानुसार कमिशन वाढवले जावे, असे पेट्रोलियम मंत्रालयाचे सूत्र आहे. त्यामुळेच या मागणीसाठी आम्ही हे आंदोलन करीत आहोत,’ असं रवी शिंदे यांनी सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button