breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

लसीकरणात ज्येष्ठांचे हाल; केंद्र तब्बल २० किमी अंतरापर्यंत पायपीट

  • केंद्र २० किमी अंतरावर; विक्रमगडमध्ये ज्येष्ठ नागरिकांची दमछाक; महिनाभरात केवळ ७८ जणांचे लसीकरण

वाडा |

विक्रमगड शहरापासून १५ ते २० किलोमीटर लांब अंतरावर असलेल्या तलवाडा, कुंझ्रे व मलवाडा या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ही लस देणे सुरू केल्याने या ठिकाणी पोहोचण्यासाठी विक्रमगड शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. विक्रमगड येथून लसीकरणाच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवासाची सुविधा उपलब्ध नसल्याने या ज्येष्ठ नागरिकांना खासगी वाहनाने केंद्रात जावे लागत आहे. विक्रमगड शहर व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या जवळ जवळ १३ हजारांच्या आसपास आहे. मात्र लसीकरणास सुरुवात होवून महिना होत आला असतानाही अवघे ७८ जेष्ठ नागरिकांनी लसीकरण केले असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे विक्रमगडच्या ग्रामीण रुग्णालयातच लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.

विक्रमगड तालुक्यात तिसऱ्या टप्पात ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला ५ मार्चपासून सुरुवात करण्यात आली आहे. ही लसीकरण प्रक्रिया ऑनलाइन आहे. सद्य: स्थित तालुक्यातील मलवाडा, कुंझ्रे व तलवाडा या तीन प्राथमिक आरोग्य केद्रांवर ही लस दिली जात आहे. परंतु ही केंद्र विक्रमगड शहरापासून किमान १५ ते २० किमी अंतरावर असल्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी ते त्रासदायक ठरत असल्याची तक्रार येथील ज्येष्ठ नागरिक अरुण मनोरे, विलास वाडेकर, सरला नेवे, अरुण आळशी, एकनाथ ढाले आदींनी केली आहे. सद्य: स्थितीत विक्रमगड तालुक्यात करोना संसर्ग आटोक्यात असून गेल्या काही दिवसांत फक्त ६ रुग्ण सकारात्मक आढळले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तर ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या लसीसंदर्भात आशा सेविकांना गाव—खेडोपाडी पाठवून माहिती दिली जात आहे. प्रत्येक लसीकरण केद्रांमध्ये डॉक्टर, कर्मचारी व आशा सेविका अशी पाच जणांची पथके काम करत आहेत.

  • मुख्य शहरात सुविधेची मागणी

तलवाडा, कुंझ्रे व मलवाडा तीन केंद्राव्यतिरिक्त विक्रमगड मुख्य शहराच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात एक केंद्र सुरू करावे जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांसह शहराच्या ठिकाणी बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्या अनेक ज्येष्ठ नागरिक व इतर नागरिकांनाही ते सोईचे होईल, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

वाचा- रावेत शिंदेवस्ती परिसरात फिटनेस 2 स्पोर्ट्स जिमच्या वतीने रक्तदान शिबीरास तरुणांचे प्रोत्साहन

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button