breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मेडीकल गॅस पाईपलाईन निविदा रद्द करा – नगरसेवक तुषार कामठे

  • ‘शुभम ईपीसी’सह सल्लागाराला काळ्या यादी टाका

पिंपरी महाईन्यूज

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नव्याने बांधलेल्या चार रुग्णालयात मेडीकल गॅस पाईपलाईन बसविणेत येणार आहे. त्याकरिता दुस-यांदा निविदा प्रसिध्द करण्यात आली. परंतू, एल1 आलेल्या ‘शुभम ईपीसी’ ठेकेदाराने जोडलेल्या कागदपत्राच्या मुल्यमापनात गंभीर चूका निर्दशनास आलेल्या आहेत. त्या ठेकेदार कंपनीने इंडस्ट्रीज क्षेत्रात वापरणा-या उत्पादित कंपनीचे ‘प्राॅडक्ट’ वापरत आहेत. शिवाय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चीन कंपनीच्या उत्पादित केलेले साहित्य देखील वापरण्यास बंदी घातली आहे. तरीही ‘शुभम ईपीसी’ ठेकेदाराने ‘एजीएसएस सिस्टीम’ हे चीनच्या उत्पादित कंपनीचे असल्याचे आढळून आलेले आहे.याकडे संबंधित पालिकेच्या अधिका-यासह सल्लागाराने जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सदरील निविदा रद्द करुन त्या ठेकेदार कंपनीसह सल्लागारास काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी नगरसेवक तुषार कामठे यांनी केली आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी गंभीर तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात नागरिकांच्या जीवावर बेतण्याची दाट शक्यता आहे.
महापालिकेने नवीन भोसरी, जिजामाता, थेरगाव आणि आकुर्डी या चार रुग्णालयात मेडिकल गॅस पाइपलाइन बसविण्यात येणार आहे. त्याकरिता भांडार विभागाने निविदा नोटीस क्रमांक 43/2020-21 जानेवारी महिन्यात 4 जानेवारीला प्रसिद्ध केली होती. 26 कोटी 61 लाख रुपयांच्या या निविदेसाठी सुरुवातीला 5 निविदाकारांनी सहभाग नोंदविला होता. मात्र, कुठलेही कारण न देता तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही निविदा रद्द केली होती.
त्यानंतर नव्याने सूचना क्रमांक 48/202021 द्वारे 28 जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आली. निविदेसाठी 5 फेब्रुवारी ही सात दिवसाची अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यावेळी निविदा पुर्व बैठक घेतलेली नाही. या निविदेत 9 जणांनी सहभागी झाले. यापैकी 8 ठेकेदार पात्र ठरले असून एकजण अपात्र ठरला आहे.
ठेकेदार पात्र-अपात्र ठरविताना संबंधित अधिकारी व सल्लागाराने आपल्या मर्जीतील ठेकेदार कंपनीचे त्रुटीकडे आणि पात्रतेसाठी लागणा-या कागदपत्राकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले. प्री-बिड न घेतल्यामुळे कित्येक ठेकेदाराने अर्टी-शर्तीची पुर्तता न केल्याचे दिसूनही त्या तक्रारीकडे अधिका-यांनी दुर्लक्ष केले.  पात्र ठरविल्यानंतर आर्थिक बिडचे दुसरे पाकीट उघडण्यात आले. तब्बल 30 टक्‍क्‍यांहून वजा दराने एका ठेकेदाराने बोली लावत 26 कोटी 61 लाखांचे काम 18 कोटी 31 लाख रुपयांमध्ये पूर्ण करण्याची तयारी दर्शविली आहे. हे काम ‘शुभम ईपीसी’ कंपनी ठेकेदार एल 1 आलेला आहे. त्या ठेकेदाराच्या कागदपत्रामध्ये गंभीर चुका निर्दशनास येत आहेत.
सदरील कामास एकाच उत्पादित कंपनीचे नऊ ‘प्राॅडक्ट’ अपेक्षित असताना त्याकडे केवळ आठच कंपनीचे असून एक ‘प्राॅडक्ट’ दुस-या कंपनीचे आहे. विशेषता एका चीनी कंपनीचे उत्पादित ‘प्राॅडक्ट’ वापरणार असल्याचे कागदपत्रात आढळून येत आहे. तसेच सदरील ठेकेदाराचे ‘प्राॅडक्ट’ हे इंडस्टील क्षेत्रात वापरणारे असून त्याचा मेडीकल क्षेत्राशी काहीही संबंध नाही. कागदपत्राचे मुल्यमापन करताना या त्रुटी अधिका-यासह सल्लागाराला दिसलेल्या नाहीत. मेडीकल वॅक्यूम सिस्टीम संर्दभात अनूभव दाखला जोडताना तीन रुग्णालयात कामे केल्याचे सांगितले आहे. प्रत्यक्षात एकाच रुग्णांचा दाखला दिलेला आहे.
दरम्यान, शुभम ठेकेदारालाच काम मिळावे, यासाठी कागदपत्राचे मुल्यमापन करताना त्या कंपनीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. सदरील कंपनीचे गंभीर त्रूटी निर्दशनास येवूनही त्याची तक्रार करताना एक लाख रुपयाचा डीडी भरुन आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे. तरीही आयुक्तांनी त्या ठेकेदार कंपनीला पाठिशी घातले आहे. सदरील एल1 आलेल्या ठेकेदाराची कागदपत्रांची पुन्हा चैकशी करुन दोषी अधिका-यासह सल्लागार कंपनीला काळ्या यादीत टाकावे, तसेच सदरील निविदा रद्द करण्यात यावी, अशी मागणी कामठे यांनी केली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button