breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीपुणे
रावेत शिंदेवस्ती परिसरात फिटनेस 2 स्पोर्ट्स जिमच्या वतीने रक्तदान शिबीरास तरुणांचे प्रोत्साहन
पुणे |
सध्याची कोराना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेत व त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहर परिसरात होत असलेल्या रक्त पुरवठा बाबत तुडवड्याची बाब लक्षात घेतली असता, रावेत शिंदेवस्ती परिसरात फिटनेस 2 स्पोर्ट्स जिम च्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी परिसरातील शेकडो नागरिकांनी आणि खेळाडुंनी रक्तदान करत सहकार्य केले. खेळ आणि व्यायाम यांचा समन्वय साधुन आपण आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवुण कोरोना सारख्या आजारावर नियंत्रण ठेऊ शकतो अश्याप्रकारचे संबोधन यावेळी फिटनेस 2 स्पोर्ट्स जिमच्या माध्यमातून करण्यात आले. याप्रसंगी संजिवनी ब्लड बँक यांचे उत्तम सहकार्य लाभले.
वाचा- “सचिन वाझेंनी असा काय खुलासा केला की, शरद पवारांच्या अचानक पोटात दुखायला लागलं?”- भाजपा