breaking-newsमनोरंजन

पलक तिवारीच्या पहिल्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज

अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी हिच्या पहिल्या चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय याने पलकला चित्रपटात संधी दिली असून त्याने रिलीज केलेल्या पोस्टरमध्ये पलकचा जबरदस्त अंदाज दिसून येत आहे. पलकच्या पहिल्या चित्रपटाचे नाव रोझी असून हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे.

पलक तिवारी गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. ती तिचे सुंदर फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर नियमित शेअर करत असते. पलक ही तिच्या आईपेक्षा जास्त सुंदर असून तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर तिचे बरेच फॉलोअर्स आहेत. तिच्या एका फोटोवर चाहत्यांच्या कमेंट व लाईक्सचा पाऊस पडत असतो.

पलक तिवारी ही श्वेता तिवारी आणि तिचा पहिला पती राजा चौधरी यांची मुलगी आहे. यानंतर श्वेताने अभिनव कोहलीशी लग्न केले. रेयांश हा श्वेता आणि अभिनव यांचा मुलगा आहे. पलक व श्वेताने अभिनव कोहलीवर गंभीर आरोप केले होते. श्वेता व अभिनवचा अद्याप घटस्फोट झालेला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button