breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

‘मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा’; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे : मतदार यादी हा लोकशाहीचा पाया असून तो सशक्त करण्यासाठी तसेच त्याची गुणवत्ता राखत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयामध्ये १०० टक्के मतदार नोंदणी करुन सर्वंकष मतदार नोंदणी करुन मतदान प्रक्रियेतील नवयुवकांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

यासाठी सर्व पात्र विद्यार्थ्यांकडून आवश्यकतेप्रमाणे नवमतदार नोंदणीसाठी नमुना क्र. ६, नाव वगळण्यासाठी नमुना क्र. ७ आणि मतदार यादीतील, मतदार कार्डवरील तपशील, नाव यात बदल, सुधारणा करण्यासाठी नमुना क्र. ८, ८-अ भरून घ्यावेत. आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून या प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग वाढवत मतदार नोंदणी करावी, असे आवाहन या पत्रात करण्यात आले आहे.

हेही वाचा – ‘…म्हणून अजितदादा भाजपसोबत गेले’; रोहित पवारांचा खळबळजनक दावा

मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आवाहनही सर्व मतदार नोंदणी अधिकारी आणि सह मतदार नोंदणी अधिकारी, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षणाधिकारी यांना पत्राद्वारे करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button