breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

आंतरराज्य गुटखा, मटका टोळीतील आरोपींवर इचलकरंजीत गुन्हा दाखल

आंतरराज्य गुटखा व मटका टोळीतील आरोपींवर इचलकरंजी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पोलिसांच्या विरोधातच तक्रार करणार्‍या एका आरोपीचा ही समावेश आहे. या आरोपीने मोक्का अंतर्गत नगरसेवक तेलनाडे बंधूंवर तक्रार दाखल केली होती. मटक्याचा नवा सूत्रधार निर्माण होण्याच्या स्पर्धेतून हा प्रकार पुढे आला असून यामुळे इचलकरंजी परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये माजी नगरसेवक सदानंद मारुती दळवाई, दत्तात्रय मारुती दळवाई, गजानन मारुती दळवाई, जावेद चोकावे, हर्षद मालगावे आणि गुंड्या उर्फ मुसा जमादार यांचा समावेश असून त्यांचा आंतरराज्य गुटखा तस्करांशी लागेबांधे असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदरचा गुटख्याचा दीड लाखाचा माल कराड येथे पोहचविण्यात येणार असल्याचेही पुढे आले आहे. पोलिसांना नाहक त्रास व्हावा, या उद्देशाने वरिष्ठ कार्यालयाकडे खोटे आरोप करणार्‍या नरेंद्र भोरे याच्यावरील गुन्ह्यात आणखीन नव्याने कलमांची वाढ करण्यात आली असल्याची माहिती पोलिस उपअधिक्षक गणेश बिरादार व सपोनि गजेंद्र लोहार यांनी दिली आहे. मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झालेले नगरसेवक संजय व सुनील तेलनाडे बंधू फरार असल्याने ते चालवत असलेला मटका व्यवसायावर आपली हुकुमत प्रस्थापित करण्याचा दलवाई टोळीचा प्रयत्न असून त्यातून हा गुन्हा उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सेक्स रॅकेट

दलवाई गँगने गुटखा, मटका, गौण खनिज, रेती या व्यवसायातून बेकायदेशीर कृत्ये करुन वारेमाप पैसा कमविला असून महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात गुंतवणूक केली असून त्याचाही तपास केला जात आहे. भोरे त्याच्या लैगिक संबध वस्तूं विक्रीच्या दुकानातून उद्दीपित ओषधे, प्रतिबंधीत गर्भनिरोधक गोळ्या पुरविणे, विक्री करत असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत.

सात हजार कॉल रेकॉर्ड्स
या सर्व प्रकारची पाळेमुळे उकलण्यासाठी पोलिसांना बऱ्याच खस्ता खाव्या लागल्या. गुटखा तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या नरेंद्र सुरेश भोरे याच्या जप्त केलेल्या मोबाईलमधील काढून टाकलेले तब्बल ७ हजार संवाद नोंदी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button