पिंपरी / चिंचवड

किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण

पिंपरी l प्रतिनिधी

किरकोळ कारणावरून लाकडे कंपन्यांच्या मशीनने दुखापत करण्याचा धाक दाखवून तिघांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि. 9) रात्री अकरा वाजता भूमकर वस्ती, वाकड येथे घडली.

प्रदीप सशवंत भुसारी (वय 29, रा. बाणेर, पुणे) यांनी याप्रकारणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार युवराज कुदळे (वय 24, रा. भूमकर वस्ती, हिंजवडी), रविराज कुदळे (वय 24, रा. भूमकर वस्ती, हिंजवडी), चेतन रतन येवले (वय 21, रा. पाचाणे, चांदखेड, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या मित्रांसोबत लोणावळा येथे गेले होते. त्यावेळी त्यांचे मित्र गौरव केमसे यांच्या मोबाईल फोनवर आरोपी रविराज याने फोन केला. एम एच 14 / एच के 0010 ही गाडी कोणाची आहे, असे त्याने विचारले. ती गाडी सुरज भूमकर याची असल्याचे आरोपीला सांगितले असता त्याने भूमकर वस्ती येथे येण्यास सांगितले.

फिर्यादी व त्यांचे मित्र भूमकर वस्ती येथे गेले. ‘मला शिव्या का देत होता’ अशी गौरव केमसे यांनी आरोपींना विचारणा केली. त्याचा राग आल्याने रविराज याने लाकडे कापण्याची मशीन सुरु करून त्याचा धाक दाखवून युवराज कुदळे याने फिर्यादी यांच्या डोक्यात लोखंडी हत्याराने मारून गंभीर दुखापत केली. आरोपी चेतन येवले याने हाताने मारहाण करून शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपी रविराज कुदळे आणि चेतन येवले या दोघांना अटक केली आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश खारगे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button