breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

Christmas: देशभरात नाताळाचा उत्साह; राष्ट्रपतींसह पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली – कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्व सण-उत्सव अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात आले. आज नाताळनिमित्तही संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे, मात्र कोरोनामुळे हा सण साधेपणाने साजरा होत आहे. दरम्यान, कोरोना संकाटाच्या पार्श्वभूमीवर यंदा नाताळ साजरा करताना सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत. तोंडाला मास्क लावणे, चर्चमध्ये प्रार्थनेसाठी २०हून अधिक लोकांची गर्दी होता कामा नये, रात्रीच्या नाताळ पार्ट्यावर निर्बंध, ६० वर्षांवरील व्यक्ती आणि लहान मुलांना शक्यतो घराबाहेर पडू नये, शक्यतो घरातच सेलिब्रेशन करावं, फिजिकल डिस्टन्सिंगचं कसोशीने पालन करावं अशी नियमावली या निमित्त जाहीर करण्यात आली आहे.

वाचा:-Earthquake in Delhi: दिल्लीत पहाटे भूकंपाचे हादरे; नागरिकांमध्ये घबराट

तसेच आज येशू ख्रिस्ताच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती कोविंद यांनी ट्विटद्वारे जनतेला शुभेच्छा देताना म्हटलंय, ‘ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा! मी आशा करतो की हा सण शांती आणि समृद्धीचा प्रसार करत समाजात सौहार्द वाढवेल. चला आपण येशूच्या प्रेम, करुणा आणि परोपकारी शिकवणींचं अनुसरण करुयात. तसेच समाज आणि राष्ट्रहितासाठी संकल्पबद्ध ऱाहुयात,’ त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्विट करुन देशवासियांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ‘मेरी ख्रिसमस! प्रभू ख्रिस्ताचे जीवन आणि तत्त्व जगभरातील कोट्यवधी लोकांना सामर्थ्य देतात. ख्रिस्ताचा मार्ग सर्वांना न्याय आणि सर्वसमावेशक समाज घडविण्याचा मार्ग दाखवत राहिल. प्रत्येकाने आनंदी आणि निरोगी राहावे.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button