breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

छत्रपतींचा आशिर्वाद घेणा-यांनी प्रेरणास्थळांची राष्ट्रीय स्मारकं का केली नाहीत – डॉ. अमोल कोल्हे

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पाच वर्षापूर्वी ज्यांनी रायगडला येऊन छत्रपतींचा आशिर्वाद घेतला. त्यानंतर केंद्रात बसलेल्यांना एकदाही माझ्या राजाच्या जन्मोत्सवाला फिरकावे असे वाटले नाही.तसेच, छत्रपतींचा आशिर्वाद घेतलेल्यांनी शिरूरमधल्या दोन प्रेरणास्थळांची राष्ट्रीय स्मारके का केली नाहीत, असा प्रश्न सत्तेत बसलेल्या भाजप आणि शिवसेना युती सरकारला जरूर विचारा, असे आवाहन डॉ. अमोल कोल्हे यांनी भोसरीतील राष्ट्रवादीच्या सभेत केले.

शिरूर लोकसभा मतदार संघाच्या प्रचारार्थ भोसरीत आयोजित सभेत कोल्हे बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, देवदत्त निकम, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक जालिंदर शिंदे, वसंत लोंढे आदी यावेळी उपस्थित होते.

कोल्हे म्हणाले की, भाजपच्या कार्यकाळात दहशतवादी हल्ल्यात 176 टक्केने वाढ झाली आहे. आजपर्यंत 450 जवान शहीद झाले आहेत. वायू सेनेच्या कार्याचं देखील श्रेय भाजप सरकार घेत आहे. इथून पढचं राजकारण भावनांच्या आधीन राहून होणार नाही. इथून पुढचं राजकारण सांभाळायचं असेल तर पुढच्या 20-25 वर्षाचं प्लॅनिंग सरकारला करावं लागेल. तरच, हा देश अभिमानानं उभे राहील, असेही कोल्हे म्हणाले.

पाच वर्षापूर्वी ज्यांनी रायगडला येऊन छत्रपतींचा आशिर्वाद घेतला. त्यानंतर केंद्रात बसलेल्यांना एकदाही माझ्या राजाच्या जन्मोत्सवाला यावे, असे वाटले नाही.तसेच, छत्रपतींचा आशिर्वाद घेतलेल्यांनी शिरूरमधल्या दोन प्रेरणास्थळांची राष्ट्रीय स्मारके का केली नाहीत, असा प्रश्न सरकारला विचारावा, असेही कोल्हे यांनी नागरिकांना आवाहन केले.

अमोल कोल्हे यांची महत्वाची विधाने

  • मी स्वतः एक बैलगाडा मालक आहे. 2013 नंतर बैलगाड्यांवर राजकारण केलं. त्यानंतर वाटलं होतं, कुठे तरी प्रश्न सुटेल. परंतु, सत्ताधा-यांना याची आत्मियता राहिलेली नाही. काल आलेल्या पोराकडं म्हणजे माझ्याकडे लोकं येतात याचा आर्थ मातब्बरांवरील लोकांचा विश्वास उडाला आहे.
  • बॉलिंग कोण करतो हे निश्चित झालं नाही. मैदानात बॉलर दिसायला लागले तर मैदान सोडून पळ काढला जात आहे, असा टोला खासदार आढळराव पाटलांना नाव न घेता लगावला.
  • संभाजी मालिकेत भूमिका करत असलो, तरी त्यातील फोटो कोणीही फ्लेक्सवर लावू नयेत, अशी कळकळीची विनंतीही त्यांनी नागरिकांना केली.
  • संभाजी ही मालिका गंमत नाही. ती मालिका काढण्याची हिम्मत आजपर्यंत कोणाची झालेली नाही. ती हिम्मत करणारा आज तुमच्या समोर उभा आहे. आपण वयोवृध्द आहेत. तुमचा मान राखून विनंती करतो.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button