breaking-newsपुणेमहाराष्ट्र

मुलाकडून माऊंट कांचेनजुंगा सर, त्याचवेळी आईची अन्नपूर्णा शिखराची मोहीम यशस्वी!

विवेक आणि डॉ. अंजली शिवदे यांची कामगिरी

पुणे : गिर्यारोहणाची ओढ बाळगणाऱ्या लेकाला प्रोत्साहन म्हणून वयाच्या पन्नाशीनंतर आईने गिर्यारोहणाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली आणि अवघ्या दोन वर्षांत थेट हिमालयातील अन्नपूर्णा बेसकॅम्पचा ट्रेक यशस्वी केला. डॉ. अंजली शिवदे आणि विवेक शिवदे या मायलेकांनी ही कामगिरी केली आहे. विवेकने माऊंट कांचेनजुंगा शिखर सर केले आणि त्याचवेळी डॉ. अंजली शिवदे यांनी मैत्रिणींसह अन्नपूर्णा बेसकॅम्पवर यशस्वी चढाई केली.

विवेकमध्ये असलेली गिर्यारोहणाची आवड जपतानाच ती आवड समजून घेण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी गिर्यारोहणास सुरुवात केली. सह्य़ाद्रीतील अनेक ट्रेक पूर्ण केल्यानंतर डॉ. अंजली यांनी हिमालयातील ट्रेकिंगचा सराव सुरू केला. त्यातूनच विवेक माऊंट कांचेनजुंगा मोहिमेवर असताना डॉ. अंजली यांनी अन्नपूर्णा बेसकॅम्पचा ट्रेक यशस्वी केला. त्यांनी सत्तावन्नाव्या वर्षी हे यश संपादन केले.

डॉ. अंजली शिवदे म्हणाल्या, दोन वर्षांपूर्वी विवेकची गिर्यारोहणाची आवड जपण्यासाठी आणि ती समजून घेण्यासाठी आम्ही कुटुंबीयांनी त्याच्याबरोबर लहान मोठे ट्रेक करण्यास सुरुवात केली. एक एक करत सह्य़ाद्रीतील सगळेच ट्रेक पूर्ण झाले. दरम्यान निसर्गाच्या सहवासाची आवड निर्माण झाली. त्यामुळे हिमालयाचे वेध लागले. विवेक आणि गिरिप्रेमी संस्थेचे उमेश झिरपे यांनी सुचवल्याप्रमाणे सर्वप्रथम चढाई करण्यासाठी अन्नपूर्णा बेसकॅम्पची निवड केली. पर्वती, सिंहगड चढणे, टेकडीवर जाणे असा सराव केला. मोहीम पूर्ण करण्यासाठी पती डॉ. संजय शिवदे यांचा पाठिंबा मोलाचा ठरला. पुढील वर्षी एव्हरेस्ट बेसकॅम्पवर चढाई करण्याची इच्छा आहे.

विवेक शिवदे म्हणाला, २०१४ मध्ये डेंग्यूच्या तापाने आजारी होतो. प्रकृती खालावल्याने सहा दिवस व्हेंटिलेटरवर होतो. आजारपणातून उठल्यानंतर सर्वसाधारण कुटुंबातील मुलाला पुन्हा हिमालयातील ट्रेक करण्यास परवानगी मिळेल ही शक्यता नसते. मात्र माझ्या आई-वडिलांनी स्वत ट्रेकिंगमध्ये रस दाखवला. माझ्याबरोबर सह्य़ाद्रीतील अनेक ट्रेक केले. आईलाही त्यात रुची निर्माण झाली. त्यातूनच तिने मैत्रिणींसह अन्नपूर्णा बेसकॅम्पवर चढाई केली. माऊंट कांचेनजुंगासारख्या मोहिमेवर जाताना कुटुंबाचा केवळ पाठिंबा न मिळता सक्रिय सहभागातून तो मिळणे हे मनोधैर्य वाढवणारे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button