breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

Thakre Vs Rane : कधी ग्रामपंचायतही न लढवलेला आमदार आणि कोरोनाशी बोलणारा बाबा चुरणदास…मुख्यमंत्री : निलेश राणे

मुंबई | महाईन्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ठाकरे विरुद्ध राणे वाद नवा नाही. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. यावर माजी खासदार निलेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे.

निलेश राणे यांनी ट्विटर वर म्हटले आहे की, पवारांनी मुख्यमंत्री केल्यानंतर राज्यपालांकडे भीक मागून स्वतःलाच उमेदवारी देऊन निवडणूक बिनविरोध झाली नाही तर मी राजीनामा देतो सांगणारा, कधी ग्रामपंचायत सुधा न लढवलेला पण महाराष्ट्राला देशात कोरोना मध्ये एक नंबर वर नेहणारा माणूस आमदार झाला.

तसेच, कोणाला लक्षात आलय का? Lockdown सुरू झाल्यापासून जेव्हा जेव्हा अरविंद केजरीवाल माहिती द्यायला येतात त्यानंतर त्याच संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येतात. जे निर्णय दिल्लीचे मुख्यमंत्री घेतात त्यात थोडे बदल करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथे घेतात, असेही राणे यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे, वाह !!! मुख्यमंत्री आणि कोरोना चंगु मंगु असल्यासारखं बोलले एकदम. कोरोनाशी बोलणारा जगातला पहिला बाबा चुरणदास… ह्याने सांगून टाकलं जगाला की कोरोना पुरुष आहे महिला नाही. असे ट्वीट करीत निलेश राणे यांनी एक व्हिडिओसुद्धा व्हायरल केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button