ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उपस्थित जनसमुदायच सांगतो… जहाँ जहाँ कंकर… वहाँ वहाँ शंकर… !

भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या भावना

शहराध्यक्ष शंकर जगताप यांना शाब्बासकीची थाप

पिंपरी । प्रतिनिधी

‘‘समोर उपस्थित हा प्रचंड जनसमुदाय पाहून लोकनेते लक्ष्मणभाऊ यांची प्रकर्षाने आठवण येते आहे. त्यांनी राजकारण करताना आध्यात्मचा वसा देखील घेतला होता. त्यांनी मोठे संत, विचारवंत यांना याच मैदानात आणून त्यांचे विचार सर्वांना अध्यात्मिक विचार ऐकवले होते. मात्र, आज लक्ष्मण जगताप आपल्यात नसले, तरी त्यांचा वारसा शंकरभाऊ पुढे नेत आहेत. ;या सोहळ्याला जमलेला विराट जनसुदाय हेच दर्शवतो की, ‘‘जहाँ जहाँ कंकर… वहाँ वहाँ शंकर… ’’ अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी भावना व्यक्त केल्या.

लोकनेते लक्ष्मण जगताप मित्र परिवाराच्या वतीने आणि भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर श्री अष्टविनायक शिवपुराण कथा वाचन सोहळा सुरू आहे. आज तिसऱ्या दिवशी चित्रा वाघ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सोहळ्याला भेट दिली.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री बाळा भेगडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त राहुल महिवाल, महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, शहर अभियंता मकरंद निकम, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, पोलीस उपाधीक्षक राहुल आवारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी, प्रांत संपर्कप्रमुख मिलिंद देशपांडे, प्रांत मंडल सदस्य प्रकाश मीठभाकरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा – सीमेवरील जवानांसाठी वंदे मातरम संघटनेकडून खास भेट; श्रीनगरमध्ये बसणार पुण्यातील बाप्पा

सर्व आजारांवरील औषध सनातन : चित्रा वाघ

‘‘ज्यांनी सनातन धर्मावर टीका केली, त्यांना या उपस्थित जनसमुदायाने उत्त्तर दिले आहे की, सनातन धर्म हा आजार नाही, तर सर्व आजारांवरील औषध आहे, आध्यात्म आहे म्हणून आपण आहोत, म्हणूनच हा जनसमुदाय या कथेच्या रूपाने आपल्या सनातन धर्माला पाठींबा देत आहे, असे म्हणताना चित्रा वाघ यांनी सनातन धर्मावर टीका करणाऱ्यावर हल्लाबोल केला. तसेच, शिव महापुराण कथेच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडस संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांसाठी अध्यात्मिक पर्वणी सुरू केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदनही केले. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button