breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिक्षण अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांची हकालपट्टी करा

  • मनसेच्या कार्यकर्त्यांचा महापालिकेत राडा
  • पालिकेची बदनामी झाल्याचा आरोप

पिंपरी / महाईन्यूज

शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नाव बदनाम झाले आहे. महापालिकेच्या प्रतिमेला कलंक लावणा-या अशा अधिका-याची तातडीने हकालपट्टी करावी, अशा शब्दांत मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेत राडा घातला. यावेळी मनसे गटनेते सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले.

शालेय साहित्य वाटप न करता विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून वेटीस धरले जाते. गेली कित्येक दिवस झाले प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक साहित्यांपासून वंचित आहेत. या विभागाच्या शिक्षण प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांचा शिक्षक भरती घोटाळ्यात हात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना अटक करण्यासाठी पोलीस पथकाने शिक्षण विभागाला धडक दिल्याचीही माहिती आहे. शिक्षक भरती प्रकरणात बोगस कागदपत्रांच्या आधारे अनेकांना भरती करून घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

या प्रकरणात त्यांचा जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. आता आपल्याला अटक होणार असल्याचे कळताच त्यांनी वरीष्ठांना अर्ज न करता पोलिकेतून पोबारा केला. जवळपास आठ ते नऊ दिवस त्या गायब होत्या. त्यानंतर पालिकेत हजेरी लावणा-या अधिकारी शिंदे यांना आयुक्तांनी रुजू करून घेतले. अशा गुन्हेगार अधिका-यांमुळे पालिकेची राज्यात बदनामी झाली आहे. त्यांची तातडीने हकालपट्टी करण्यात यावी. त्यांनी आजपर्यंत घेतलेल्या आर्थिक निर्णयाची चौकशी करण्यात यावी. लागलीच त्यांची पालिकेतून शासनाकडे रवानगी करावी. अन्यथा मनसेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेचे गटनेते सचिन चिखले आणि महिला सेनेच्या शहराध्यक्षा अश्विनी बांगर यांनी दिला.

शिक्षण विभागाद्वारे शाळेतील विद्यार्थी घडविण्यासाठीचा पायाभूत शैक्षणिक उपक्रम आखला जातो. अशा संवेदनशिल विभागातील अधिका-याचे हात जर भ्रष्टाचाराने बरबटलेले असतील तर त्यांच्याकडून नवीन पिढी घडविण्याची आपेक्षा कशी बाळगायची. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शिंदे यांच्याकडून शिक्षकांनी कोणता आदर्श घ्यायचा आणि विद्यार्थ्यांनी काय शिकायचे ?, असा सवाल गटनेते चिखले यांनी उपस्थित केला.

शिक्षण अधिकारी ज्योत्स्ना शिंदे हटावच्या घोषणा देत मनसेच्या कार्यकर्त्यांनी पालिकेत राडा घातला. यावेळी मनसेचे पदाधिकारी हेमंत डांगे, रुपेश पटेकर, सीमा बेलापूरकर, सुजाता काटे, दत्ता देवतरासे, विशाल मानकरी, चंद्रकांत दानवले, सुशील साळवी, अनिकेत प्रभू, आकाश लांडगे, राजू भालेराव, अनुज महाजन, शिवकुमार लोखंडे आदी यावेळी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button