breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

China, UAE मध्ये कोविड 19 विरूद्ध संभाव्य लसीचे 3 टप्प्यातील अहवाल सकारात्मक; चीन पराराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याकडून माहिती

पुणे: जगभरात कोरोना व्हायरसचा मागील सहा महिन्यासापासून सामना करत असलेले सारेच जण COVID 19 या जीवघेण्या आजाराविरूद्ध ठोस उपायाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान आज चीनमधून त्याबद्दल एक सकारात्मक माहिती समोर आली आहे. दरम्यान चीनच्या पराराष्ट्र मंत्रालयाकडून Wang Wenbin यांनी दिलेल्या माहितीनुसार कोविड 19 विरूद्धच्या संभाव्य कोविड 19 लसीचे चीन आणि United Arab Emirates मध्ये तिसर्‍या टप्प्यातील अहवाल सकारात्मक आलेले आहेत. दरम्यान United Arab Emirates मध्ये सोमवारी (14 सप्टेंबर) ला चीन निर्मित कोविड 19 च्या लसीला Emergency Approval देण्यात आलेले आहे. दरम्यान तेथे लसीच्या मानवी चाचणीला सहा आठवड्यांच्या प्रयोगानंतर समोर आलेल्या निकालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

चीन मध्ये बनवण्यात आलेली ही लस National Pharmaceutical Group (Sinopharm)ची आहे. दरम्यान Sinopharm आणि Sinovac Biotech (US listed) यांनी 3 लसी बनवण्याचं काम सुरू केलेलं आहे. तर CanSino Biologic चीनमध्ये चौथी लस बनवत आहे. काही दिवसांपूर्वी रशियामध्ये Sputnik-V vaccineला अशाचप्रकारे तातडीची मंजुरी देण्यात आलेली आहे. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी त्याच्या सुरक्षिततेची खात्री करून देण्यासाठी ती त्यांच्या लेकीला देखील दिल्याचा दावा करण्यात आला होता. दरम्यान अशाप्रकारे मानवी चाचणीचा तिसरा टप्पा पार करणारी आणि सकारात्मक अहवाल देणारी Sputnik-V vaccine नंतर ही दुसरी लस ठरणार आहे. जगभरात अमेरिका, भारत, युके मध्ये महत्त्वाच्या फार्मा कंपन्या त्यांच्या लसीच्या चाचण्या करत आहेत. आणि त्यांना आशा आहे की 2020 च्या शेवटापर्यंत किंवा 2021 च्या पहिल्या काही महिन्यांमध्ये त्यांच्या लसी बाजारात उपलब्ध होऊ शकतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button