#CoronaVirus: एकाच एटीएममध्ये गेलेल्या तीन जवानांना कोरोनाची लागण
करोना व्हायरसनं भारतातील अनेकांना ग्रासलं असून दिवसागणिक त्याचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, पत्रकार आणि पोलिसानंतर आर्मीच्या जवानांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. एएनआयनं लष्करातील सुत्राच्या साह्यानं दिलेल्या माहितीनुसार, तीन जवानांना करोनाची लागण झाली आहे. एकाच एटीएममध्ये गेल्यामुळे तिघांना करोनानं ग्रासलं आहे.
गुजरातमधील बडोद्यामध्ये लष्कराच्या तीन जवांनाना करोनाची लागण झाली आहे. हे तीनही जवान एकाच ATM मध्ये पैसे काढायला गेले होते. तिघांचेही करोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर कॅम्पमध्ये एकच खळबळ उडाली. तात्काळ त्या जवानांच्या संपर्कात आलेल्या २८ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तर तिन्ही जवानांवर सध्या उपचार सुरू करण्यात आले आहेत.
3 Army personnel tested positive for #COVID19 in Baroda,Gujarat. As per initial findings, an ATM booth seems to be the common source as they all had withdrawn money from it on same day.Their 28 close contacts have been quarantined by the force as per protocol: Indian Army Sources
— ANI (@ANI) April 23, 2020