breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

नागपुरात हजार खाटांचे कोव्हिड रुग्णालय उभारा, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

नागपूर – नागपूरमध्ये कोव्हिड रुग्णालय उभारण्यासाठी महानगरपालिकेने राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला होता. मात्र, त्यावर अद्यापही कोणताच तोडगा निघालेला नाही. त्यामुळे नागपुरात आधी हजार खाटांचे कोव्हिड रुग्णालय उभारा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. तसंच, यावर एका आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचं उल्लंघन झाल्यास राज्य सरकारच्या सचिवांना न्यायालयात हजर रहावं लागणार आहे.

नागपूर जिल्ह्यात 24 तासांत 1957 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 15 दिवसांत नागपूर जिल्ह्यात 702 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नागपुरातील कोरोनाची परिस्थिती इतकी भयावह असून राज्य सरकार मात्र कोव्हिड रुग्णालयाबाबत चालढकलपणा करताना दिसत आहे. विभागीय क्रीडा संकुलात हे कोव्हिड रुग्णालय प्रस्तावित आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button