breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिंचवडची पोटनिवडणूक निवडणूक लढवणार; दोन दिवसांत घोषणा

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील अत्यंत प्रतिष्ठेची असलेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याबाबत राष्ट्रवादीचे कारभारी अजित पवार यांनी होकारार्थी संकेत दिले आहेत. त्यासाठी दोन दिवसांत मुंबईत बैठक होणार असून, निर्णय घेण्यात येणार आहे. 

पुणे जिल्ह्यातील कसबापेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत आता चुरस निर्माण होणार आहे. या दोन्ही ठिकाणी निवडणुक लढविण्याचे संकेत राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिले आहेत. ह्या दोन्ही पोटनिवडणूक लढविण्याचा आग्रह कार्यकर्त्यांचा असून याबाबत सर्व एकत्रित  विचार निर्णय घेतला जाईल, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

अजित पवार म्हणाले की,  पिंपरी-चिंचवड येथील कार्यकर्त्यांनी माझी भेट घेऊन पोटनिवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत. अशा पद्धतीच्या ज्यावेळी निवडणुका लागतात त्यावेळी सगळ्यांशी एकत्रित चर्चा होते. त्यासाठी आम्ही दि. २२ ते २३ तारखेला मुंबईत एकत्रित येणार आहोत. त्यावेळी आम्ही या निवडणुकीबाबत निर्णय घेणार आहोत. 

दरम्यान, पिंपरी- चिंचवड पोटनिवडणुकीत लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप आणि अश्विनी जगताप यांची नावे भाजपा पक्षश्रेष्ठींकडे पाठवली आहेत. तसेच, कसब्यात देखील विविध उमेदवारांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यावर देखील आम्ही सर्व एकत्रित चर्चा करून निर्णय घेऊ असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे. यातच कसब्यातून मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. परंतु अद्यापही दोन्ही ठिकाणी कोणत्याही उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही, असेही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

पहा व्हीडिओ… काय म्हणाले विरोधी पक्षनेते अजित पवार
https://www.facebook.com/reel/498747435706551

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button