breaking-newsटेक -तंत्र

#Lockdown:टिकटॉक, फेसबुक-ट्विटरवरील गैरप्रकारांसंदर्भात तक्रारी, २१३ जणांना अटक

मुंबई : लॉकडाऊन काळात टिकटॉक, फेसबुक, ट्विटरवरील गैरप्रकारांसंदर्भात अनेक तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेतल्यानंतर  २१३ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात राज्यात सायबर संदर्भात ४०४ गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे.

टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य समाजमाध्यमांवर  चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात तक्रारी आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यात विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण ४०४ गुन्ह्यांची (ज्यापैकी २० N.C आहेत) नोंद २० मे २०२० पर्यंत झाली आहे. या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १७० गुन्हे दाखल झाले आहेत.

तसेच आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १६१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी १८ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ७ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, यूट्यूब ) गैरवापर केल्याप्रकरणी ४४ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २१३ आरोपींना अटक केल्याची माहिती सायबर क्राईम पोलिसांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button