breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

२८ रुपयांसाठी रिक्षाचा पाठलाग… अन् गमावला जीव; २६ वर्षीय तरुणाच्या कुटुंबीयांना मिळणार ४३ लाख

मुंबईः सुट्ट्या पैशांसाठी रिक्षाचा पाठलाग करताना अपघातात मृत्यू झालेल्या २६ वर्षीय तरुणाच्या कुटुंबीयांना ४३ लाख रुपये मिळणार आहे. २०१६मध्ये विक्रोळी येथे राहणाऱ्या तरुणाला रिक्षा चालकाने उरलेले २८ रुपये देण्यास नकार दिल्याने तरुणाने रिक्षाचा पाठलाग केला. मात्र, अपघातात त्याला जीव गमवावा लागला. चेतन अर्चिणेकर हा तरुण सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होता. रिक्षातून घरी परतत असताना त्याचे रिक्षाचे भाडे १७२ रुपये झाले होते. तेव्हा त्याने २०० रुपये रिक्षा चालकाला दिले. मात्र, चालकाने भाड्याचे उरलेले २८ रुपये चेतनला द्यायला नकार दिला. त्यावेळेस चेतनने रिक्षा चालकासोबत वाद घातल्यानंतर चालकाने रिक्षाचा वेग वाढवत तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळेस चेतनमध्ये आला पण रिक्षा चालकाने त्याच्या अंगावर गाडी घातली. त्यातच चेतनचा दुर्देवी मृत्यू झाला. चेतनच्या वडिलांच्या डोळ्यांदेखत हा थरार घडला.

फ्युचर जनरली इंडिया इन्युरन्सने केलेला दावा मोटार अपघात दावा न्यायाधिकरण (MACT) खोडून काढला आहे. फ्युचर जनरल इंडियाने दावा केला होता की, हे एक दोषी हत्या प्रकरण असून आम्ही जबाबदार नाहीत. मात्र, न्यायाधिकरणाने या दाव्याचे खंडन करत मृत्यू प्रमाणपत्र आणि पोस्टमार्टम अहवालाचा दाखला देत चेतनचा मृत्यू मोटार वाहन अपघातात झालेल्या गंभीर दुखापतीमुळं झाल्याचे निदर्शनास आणून दिलं. “अपघात ज्या पद्धतीने झाला त्यावरून स्पष्टपणे सिद्ध होते की ऑटोरिक्षाच्या चालकालाअपघात टाळण्याची संधी होती. मात्र, चालक निष्काळजी आणि अपघातास जबाबदार होता,” असे ए एम चांदेकर यांच्या अध्यक्षतेखालील न्यायाधिकरणाने स्पष्ट केलं आहे.

चेतन अर्चिणेकरचा अपघातासमयी तो एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होता. त्यावेळी त्याचा मासिक पगार १५,००० रुपये होता. चेतनच्या त्यावेळच्या मासिक पगाराचा विचार करता त्याच्या पालकांना गणपण, स्नेहा व धाकटा भाऊ ओमकार अर्चिणेकर यांना त्या हिशोबाने नुकसान भरपाई मिळावी, असं न्यायाधिकरणाने स्पष्ट केलं आहे. ४३ लाख रुपयांची भरपाई (व्याजासह) विमा कंपनी आणि ऑटोरिक्षाचे मालक कमलेश मिश्रा यांनी संयुक्तपणे भरावी लागेल, असंही न्यायाधिकरणाने स्पष्ट केलं आहे. चेतनच्या कुटुंबाने डिसेंबर २०१६ मध्ये न्यायाधिकरणासमोर आपला दावा सादर केला होता. त्यांनी सांगितले की २३ जुलै २०१६ रोजी पहाटे १.३० च्या सुमारास चेतन विमानतळावरून ऑटोरिक्षाने विक्रोळी पूर्वेकडील त्यांच्या घरी परतत होता. घराजवळ आल्यावर त्याने ड्रायव्हरला २०० रुपये दिले. मात्र, ऑटोचालकाने सुट्टे पैसे देण्यास नकार दिला. तसंच, आपल्याकडे पैसेच नसल्याचा दावा करत त्याने रिक्षा सुरू केली.

चेतनने त्याला थांबण्यास सांगितले असता त्याने वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाहन पलटी होऊन चेतनच्या अंगावर कोसळले. या अपघातात चेतन गंभीर जखमी झाला. या प्रकरणाची नोंद विक्रोळी पोलीस ठाण्यात करण्यात आली. चेतनच्या मृत्यूमुळे त्यांचा पालकांना भावनिक आणि आर्थिक दोन्ही प्रकारे त्रास झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. दरम्यान, रिक्षाचालक न्यायाधिकरणासमोर हजर झाला नाही आणि त्याच्या विरोधात तत्पूर्वी आदेश देण्यात आला. चेतनच्या कुटुंबीयांनी सादर केलेल्या दाव्यातील रक्कम नाकारण्यासाठी केलेल्या युक्तिवादावेळी, विमा कंपनीने रिक्षा चालकाकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते, असं म्हटलं होतं. मात्र, विमा कंपनीने कोणताही तोंडी किंवा कागदोपत्री पुरावा जोडलेला नाही, असं म्हणत न्यायाधिकरणाने हा दावा सिद्ध करण्यासाठी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button