ताज्या घडामोडीमुंबई

आरोग्य भरती प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात २० आरोपींवर दोषारोपपत्र

पुणे | आरोग्य भरती गट (ड) लेखी परीक्षा प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात अटकेत असलेल्या १९ आरोपींविरोधात सायबर गुन्हे शाखेने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आरोग्य भरती प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात सायबर पोलिसांनी आरोग्य विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह दलालांना अटक केली होती. याप्रकरणात विजय मुऱ्हाडे, अनिल गायकवाड, सुरेश जगताप, बबन मुंढे, संदीप भुतेकर, प्रकाश मिसाळ, उद्धव नागरगोजे, प्रशांत बडगिरे, डॉ. संदीप जोगदंड, शाम म्हस्के, राजेंद्र सानप, महेश बोटले, नामदेव करांडे, उमेश मोहिते, अजय चव्हाण, कृष्णा जाधव, अंकीत चनखोरे, आनंद डोंगरे, अर्जुन बमनावत उर्फ राजपूत यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. आरोपींविरोधात दाखल करण्यात आलेले दोषारोपपत्र तीन हजार ८१६ पानी आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, मीनल सुपे-पाटील आदींनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button