breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोनाच्या नकारात्मक बातम्या प्रसिध्द होत असल्यामुळे रुग्णांचे खच्चीकरण

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी व्यक्त केली खंत
  • रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी सकारात्मक बातम्या प्रसिध्द करण्याचे आवाहन

पिंपरी / महाईन्यूज

कोविड 19 विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असून अनेकांचे मृत्यू होत असल्याची माहिती सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. परंतु, वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी असून त्याकडे लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. पिंपरी-चिंचवडमधील बाधित रुग्णांचा रिकव्हरी रेट अत्यंत चांगला आहे. पॅरामेडिकल स्टाफ आहोरात्र कार्यरत असल्यामुळे हजारो रुग्ण कोरोनावर यशश्वी मात करत आहेत. परंतु, कोरोनाबाबत नकारात्मक बातम्या सोशल मीडियातून प्रसारीत होत असल्यामुळे रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णांचे मनोधैर्य खचत आहे. रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी वृत्तपत्र व डीजिटल मीडिया माध्यम संस्थांनी कोरोनासंदर्भात सकारात्मक बातम्या प्रसिध्द कराव्यात, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये आजपर्यंत 1 लाख 83 हजार 804 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी 1 लाख 69 हजार 235 एवढ्या लोकांनी कोरोनावर यशस्वी मात केली. 8 हजार 384 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर, 2 हजार 551 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याशिवाय, हजारो नागरिक कोरोना केअर सेंटरमध्ये काळजी घेण्यासाठी दाखल झाले आहेत. त्यांच्यातील हजार नागरिकांचा वैद्यकीय अहवाल प्रगतीपथावर आहे. त्यामुळे शहराचा रिकव्हरी रेट अत्यंत चांगला आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील डॉक्टर्स, नर्स तसेच पॅरामेडिकल स्टाफ आहोरात्र कार्यरत आहेत. त्यामुळे कोरोनावर यशस्वी मात केलेल्या नागरिकांनी आपल्याला आलेला सकारात्मक अनुभव व्हिडिओ अथवा फोटोच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर करावा, असेही काटे यांनी म्हटले आहे.

कोरोनाशी संबंधित प्रसार माध्यमातून येणा-या नकारात्मक बातम्या वाचने टाळावे. अशा बातम्या सोशल मीडियातून व्हायरल करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. नकारात्मक माहिती उपचार घेत असलेल्या रुग्णांपर्यंत पोचल्यास त्याचे मनोधैर्य खचते. शिवाय कोरोना विषाणुशी लढण्यासाठी रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता असते. शहरात केवळ 2 टक्के मृत्यूचे प्रमाण आहे. मृत्यू झालेल्यांना आपण श्रध्दांजली जरूर अर्पण केली पाहिजे. परंतु, त्यांच्याशी निगडीत भितीदायक माहिती प्रसारीत करणे टाळले पाहिजे. कारण, अशा माहितीमुळे रुग्ण गर्भगळीत होऊन त्याची कोरोनाशी लढाई अंतिम टप्प्यावर येण्याची शास्वती असते. रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी सकारात्मक बातम्या वृत्तपत्र आणि डीजिटल मीडिया माध्यमातून प्रसिध्द झाल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाण निश्चितच वाढेल. तसेच, सोशल मीडियाद्वारे खच्चीकरण करणारी माहिती व्हायरल करणा-यांवर पोलीस व पालिकेच्या प्रशासन यंत्रणेने लक्ष ठेवले पाहिजे. संबंधितांना समज देऊन कायदेशीर कारवाईची भिती घातली पाहिजे, असेही काटे यांनी प्रसिध्दीपत्रकातून नमूद केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button