breaking-newsपिंपरी / चिंचवड

जागतिक महिला दिनानिमित्त जाधववाडीत खेळ रंगला पैठणीचा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

जागतिक महिला दिनानिमित्त माजी महापौर राहुल जाधव यांच्या वतीने खास महिला भगिनींसाठी खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी प्रत्येक सहभागी महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक विजेत्या महिलेस एलसीडी फ्रिज वॉशिंग मशीन सोन्याची नथ व मानाची पैठणी भेट देऊन गौरवण्यात आले.

माजी महापौर राहुल जाधव म्हणाले की, प्रत्येक महिलेमध्ये ज्याप्रमाणे एक आई एक बहीण एक पत्नी असते त्याचप्रमाणे प्रत्येक महिलांमध्ये एक कलाकार पण दडलेला असतो. म्हणूनच त्यांच्या कलागुणांना हक्काचं व्यासपीठ देण्यासाठी तसेच इतर महिलांमध्ये जागृती करण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला.

सर्व महिला भगिनीसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था राहुल जाधव स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली होती. यावेळी माजी महापौर राहुल जाधव, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या सुकन्या साक्षी महेश लांडगे, दत्त दिगंबर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन मंगल राहुल जाधव, प्रीती बोंडे, संगीता भोसले, सोनम रवींद्र जांभुळकर, तसेच सामाजिक कार्यकर्ते संभाजी घारे, रवींद्र जांभुळकर, महेंद्र मंडलिक, प्रताप भांबे, रवी भुजबळ आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button