breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा ‘जय सियाराम’चा नारा!

Rishi Sunak : १५ ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात रामायण पठणाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान ऋषी सुनक यांनी हजेरी लावली होती.यावेळी त्यांनी ‘जय सियाराम’चा नारा दिला आहे. मी या ठिकाणी इंग्लंडचा पंतप्रधान म्हणून नाही, तर एक हिंदू म्हणून उपस्थित आहे, असं ऋषी सुनक म्हणाले.

ऋषी सुनक म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने केंब्रिज विद्यापीठात आयोजित मोरारी बापू यांच्या राम कथेला उपस्थित राहणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आज मी या ठिकाणी इंग्लंडचा पंतप्रधान म्हणून उपस्थित नाही, तर एक हिंदू म्हणून उपस्थित आहे.

हेही वाचा – ‘शरद पवार सोबत आले तरच अजित पवार मुख्यमंत्री, मोदींची अट’; काँग्रेस नेत्याचा दावा

माझ्यासाठी श्रद्धा ही खूप व्यक्तिगत गोष्ट आहे. ही श्रद्धा मला जीवनाच्या प्रत्येक प्रसंगात मार्गदर्शन करत असते. पंतप्रधान होणं ही फार मोठी सन्मानाची गोष्ट आहे, पण हे सोपं काम नाही. या पदावर असताना खूप कठीण निर्णय घ्यावे लागतात. कठोर निर्णय घ्यावे लागतात. अशावेळी देशासाठी सर्वोत्तम काम करण्यासाठी मला आपली श्रद्धा धाडस, हिंमत आणि ताकद देते, असं ऋषी सुनक म्हणाले.

माझ्यासाठी भगवान राम कायमच प्रेरणा देणारे आहेत. त्यांच्याकडून मला धाडसाने जीवनातील आव्हानांचा सामना करण्यासाठी, माणूसकीने सरकार चालवण्यासाठी आणि निस्वार्थपणे काम करण्यासाठी प्रेरणा मिळते, असंही ऋषी सुनक म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button