breaking-newsमनोरंजन

रितेश-जेनेलिया घेणार राजकारणातील या मोठ्या व्यक्तीची मुलाखत

बॉलिवूडमधील प्रेक्षकांचं लाडकं कपल अर्थात अभिनेता रितेश देशमुख व त्याची पत्नी जेनेलिया डिसुझा-देशमुख हे राजकारणातील एका मोठ्या व्यक्तीची सपत्नीक मुलाखत घेणार आहेत. ही व्यक्ती म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांची पत्नी अमिता चव्हाण यांची प्रकट मुलाखत ते घेणार आहेत. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने नांदेडमध्ये आयोजित ‘आनंदाचे डोही’ कार्यक्रमात ही मेगामुलाखत नक्कीच रंगणार आहे.

१४ फेब्रुवारीला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यांची पत्नी अमिता चव्हाण यांची विशेष मुलाखत घेतली जाणार आहे. महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी समारोह समितीच्या वतीने हा कार्यक्रम शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडेल. दिवंगत नेते डॉ. शंकरराव चव्हाण कौटुंबिक आयुष्यात कसे होते? मुलांना आणि नातवंडांना त्यांनी काय शिकवण दिली, कोणते संस्कार दिले अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या मुलाखतीत मिळणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button