breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

“भव्य-दिव्य उपक्रम हिच आमदार महेश लांडगेंची ओळख”; चंद्रकांत पाटील

महिला बचतगटांकडून तयार केलेल्या वस्तुंना मार्केट मिळाले पाहिजे

भोसरी : आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भोसरीतील गावजत्रा मैदानावर ‘इंद्रायणी थडी- २०२३’ महोत्सवाचा शुभारंभ फडणवीस यांच्याहस्ते बुधवारी सायंकाळी झाला. दीप प्रज्वलन करुन महोत्सवाची सुरूवात करण्यात आली.

महेश लांडगे यांचा प्रत्येक उपक्रम भव्य-दिव्य असतो. बैलगाडा शर्यत, पक्षनिष्ठा पुतळे, प्रभू श्रीराम मंदिर प्रतिकृती, ग्रामीण संस्कृती, रिव्हर सायक्लोथॉन असे रेकॉर्ड ब्रेक उपक्रम राबवले जात आहेत. प्रत्येक बाबींचा बारकाईने विचार केलेला पहायला मिळतो. ज्यांनी भारतीय जनता पार्टी पक्ष उभा केला. त्यांचे पुतळे या महोत्सवात लावण्यात आले आहेत, ही सर्वात महत्वाची बाब आहे. पाच हजाराहून अधिक वर्षांपासून हिंदू समाज ज्यांचे नाव घेवून पुढे आला त्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. महिला बचतगटांकडून तयार केलेल्या वस्तुंना मार्केट मिळाले पाहिजे, तर प्रोत्साहन मिळेल, हा हेतू स्वागतार्ह आहे, असं पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रखर हिंदूत्वाचा पुरस्कर्ते कालिचरण महाराज, समरसता गुरूकुलमचे पद्मश्री गिरीश प्रभुणे, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार राहुल कुल, उमा खापरे, जगदीश मुळीक, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार शरद सोनवणे, बापुसाहेब पठारे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप, कांचन कुल, शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पुजा लांडगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, भाजपा सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

सोबतच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रभू श्रीराम यांचे मूर्ती देवून माजी महापौर माई ढोरे, नितीन काळजे, राहुल जाधव यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. तसेच, माजी समिती सभापती विलास मडीगेरी, सतोष लोंढे यांच्याहस्ते चंद्रकांत पाटील यांचा सन्मान करण्यात आला. तसेच, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक, दिगंबर भेगडे आणि बाबुराव पाचर्णे यांच्या कुटुंबियांनाही प्रभू श्रीराम मूर्ती भेट देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button