breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

चंद्रकांत पाटील यांचे भीतीदायक भाष्य; म्हणाले, पुण्यात आंतकवाद्यांची मोठी लिंक..

पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील गुन्हेगारीबाबत भीतीदायक मोठं भाष्य केलं आहे. पुण्यात आंतकवाद्यांची मोठी लिंक सापडली आहे. या लिंकमुळे आपल्याला हादरा बसेल. त्याचे धागेदोरे खूप लांबपर्यंत आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ते आकुर्डीतील एका कार्यक्रमात बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, पोलीस अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कठीण गुन्हे उघडकीस आणत आहेत. पुण्यात आंतकवाद्यांची मोठी लिंक सापडली. या लिंकमुळे आपल्याला हादरा बसेल. त्याचे धागेदोरे खूप लांबपर्यंत आहेत. ते कुठे-कुठे चालले आहेत, हे मी जाहीरपणे बोलू शकत नाही. पोलिसांवर उलट गोळीबार झाला. त्यात दोघे पकडले. एकजण पळाला. परत त्याला पकडले. अशा गोष्टी पोलीस विभागात होत असतात.

हेही वाचा – तंत्रज्ञानाच्या गैरवापराच्या काळात नागरिकांची माध्यम साक्षरता आपल्याला ध्रुवीकरणापासून वाचवेल; माध्यम तज्ज्ञांचे मत

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांच्या सोयी सुविधांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी देणार आहे. जिल्हा नियोजन समितीतून ४० कोटी दिले आहेत. लोक सहभागातून ६० कोटी रुपये मिळवून देणार आहे. पुणे शहरात १०० पोलीस चौक्या आहेत. त्यांची अवस्था बिकट आहे. पंखे खडखड करत असतात. पुणे पोलिसांनी चोरीचा हस्तगत केलेला सात कोटींचा मुद्देमाल न्यायालयातून सोडवून नागरिकांना परत केला. पोलिसांना सहकार्य केले पाहिजे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

मारामारी झाली. चोरांना पकडले हे चालत राहील. परंतु, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात ड्रग्जचे प्रमाण भयंकर वाढत चालले आहे. ड्रग्जवाले तरुण मुला, मुलींना अक्षरशः खात आहेत. त्यामुळे ड्रग्जवाल्यांवर कडक कारवाई करावी. महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखले पाहिजेत. दामिनी पथक अतिशय सक्षम आहे. पथकाला अधिकार; तसेच दुचाकी, चारचाकी वाहने द्यावीत. या गोष्टींवर लक्ष द्यावे, अशी सूचना चंद्रकांत पाटील यांनी पोलीस आयुक्तांना केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button