TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

चंद्रकांत पाटलांकडून ठाकरेंच्या बांधावरच्या दौऱ्याचं पोस्टमार्टेम

उद्धव ठाकरेंनी स्वत: मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं – चंद्रकांत पाटील

मुंबई ।

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार कशाला डबल नुकसानभरपाई दिली पाहिजे, पण उद्धव ठाकरेंनी स्वत: मुख्यमंत्री असताना काय केलं, असा सवाल भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी शरद पवार यांनी भू विकास बँकेच्या कर्जमाफीबाबत शरद पवार यांनी केलेल्या टीकेचाही प्रतिवाद केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी असा निर्णय का घेतला नाही?

कोल्हापूर: परतीच्या पावसावेळी अतिवृष्टी झाल्यामुळे राज्यातील अनेक भागांमधील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी नुकताच औरंगाबादचा दौरा केला होता. उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यावर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खोचक शैलीत टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे औरंगाबाद दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांची वक्तव्यं ऐकून शेतकरी हसत होते. या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे मोठ्याप्रमाणावर ट्रोल झाले, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. ते मंगळवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीचाही चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला. तुमचं सरकार होते. त्यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना अस्वस्थ केले. शेतकऱ्यांना २५ हजारांची मदत मिळणार होती, तीदेखील मिळली नाही. पण आताच्या सरकारने शेतकऱ्यांवर जे जे संकट आलं त्यावेळी मदत केली. शेतकऱ्यांना डबल नुकसानभरपाई दिली. शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत कशाला लाख रुपयांची मदत दिली पाहिजे. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी असा निर्णय का घेतला नाही, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. या टीकेला आता ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.

शिंदे-फडणवीस सरकारने भू विकास बँकेतील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात केलेली घोषणा फसवी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला होता. या आरोपाला चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. भू विकास बँक ही अनेक वर्षांपूर्वी बंद झाली, असे शरद पवार म्हणतात. पण शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर असणारा भू विकास बँकेच्या शिक्क्याला रिकामे करण्याचे काम आमच्या सरकारने केले. राज्यातील ६३ हजार शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर असणारा शेरा पुसण्याचा निर्णय घेऊन सरकारने त्यांचा सातबारा कोरा केला, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

सरकार बरखास्त करण्यासाठी नाना पटोले यांनी कधीही राज्यपालांकडे जावं:चंद्रकांत पाटील

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपण दिवाळीनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन शिंदे-फडणवीस सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार असल्याचे म्हटले होते. यावर चंद्रकांत पाटील यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी म्हटले की, लोकशाहीत कोणालाही राज्यपालांची भेट घेण्याचा अधिकार आहे. त्यांनी खुशाल राज्यपालांकडे जावं. आपले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चांगले आहेत. ते प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतात, सगळ्यांना चहा पाजतात, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button