breaking-newsताज्या घडामोडीपुणे

बंद विद्युत दिवे त्वरित चालू करा

नगरसेवक राहुल भंडारे यांच्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सुचना  

पुणे | प्रतिनिधी

म्हाडा कॉलनी, विमाननगर आदीसह विविध भागातील विजेच्या खांबावरील विद्युत दिवे बंद पडले होते. या बाबत नागरिकांनी स्थानिक नगरसेवक राहुल भंडारे यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या. त्याची दाखल घेत नगरसेवक भंडारे यांनी महावितरणचे कर्मचारी यांच्यासोबत विविध ठिकाणची पाहणी केली. या वेळी बंद असणारे विद्युत दिवे तत्काळ सुरु करावेत अशा सुचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

रहिवाशी भागातील अनेक ठिकाणी विद्युत दिवे बंद असण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. वयोवृद्ध, लहान मुले, महिला यांना त्याचा अधिकचं त्रास होत आहे. महावितरणकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कोणीही दखल घेत न्हवते. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. स्थानिक नागरिकांनी त्यानंतर नगरसेवक राहुल भंडारे यांच्याकडे तक्रारी केल्या. त्याची दखल घेत नगरसेवक भंडारे यांनी त्वरित पाऊले उचललीत. महावितरणचे संबधीत कर्मचारी सोबत घेऊन त्यांनी परिसराची पाहणी केली. म्हाडा कॉलनी, विमाननगर आदीसह विविध भागात बंद विद्युत दिव्यांची पाहणी केली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना हे दिवे सुरु करण्याच्या सुचना दिल्या. या वेळी नागरिकही उपस्थित होते.

दखल घेतल्यानंतर परीसरातील नागरिकांनी त्याबाबत समाधान व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button